सिंहगड रस्त्यावर हवे क्रीडा संकुल- गिरीश बापट

सिंहगड रस्त्यावर हवे क्रीडा संकुल- गिरीश बापट

खडकवासला : "सिंहगड रस्ता परिसराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. येथे रहावयास येणाऱ्या खेळाडू यांची संख्या मोठी आहे. या परिसरातील खेळाडूंना सरावासाठी व नवीन खेळाडू विद्यार्थ्यांना या स्वतंत्र क्रीडा संकुलाची गरज आहे, असे मत पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले. 

वडगाव बुद्रुक येथे पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने केदारनाथ सार्वजनिक वाचनालय आणि सामाजिक संस्था संस्थापक आणि स्थायी समिती सदस्य नगरसेवक हरिदास चरवड यांनी ही स्पर्धा आयोजित केली आहे. जिल्हा स्तरीय निवड चाचणी खुला गटातील कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन पालकमंत्री बापट यांच्या हस्ते झाले. छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून संपन्न झाले. यावेळी, महापौर मुक्ता टिळक,  आमदार भीमराव तापकीर सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, नगरसेवक प्रसन्न जगताप, कबड्डी असोसिएशांचे कार्यवाहक नगरसेवक बाबुराव चांदेरे, जगताप,नगरसेविका मंजूषा नागपुरे, ज्योती गोसावी, खडकवासला भाजपा अध्यक्ष अरुण राजवाडे, राजेंद्र देशमुख, मधुकर नलावडे, गुलाब चरवड, बाळासाहेब जाधव,दिलीप चरवड,अड.दिलीप गायकवाड, अनिल चरवड, केरबा चरवड, रामभाऊ चरवड, राहुल कुदळे, रमेश दांगट, चंद्रकांत पवळे, कुलदीप दराडे उपस्थित होते.

यावेळी महापौर टिळक यांनी आपल्या मनोगतात सहभागी खेळाडूंना  शुभेछ्च्या दिल्या. तसेच आमदार तापकिर यांनी खेळाडूंना खिलाडू वृत्ती जोपल्यास त्याचा फायदा जीवनात प्रगती साधण्यास पण होतो असे मत व्यक्त केले. वडगाव येथील बीडीपी आरक्षणाबाबत तोडगा काढण्याची विनंती चरवड यांनी बापट, महापौर व आमदार तापकीर यांना यावेळी केली. 

पहिल्या दिवशीचे सामने 
उद्घाटनाचा सामना पुरुष गटात वाघेश्वर कबड्डी संघ वाघोली  आणि धर्मवीर संघ बाळेवाडी यांच्यात रंगला यात पहिल्या डावातच धर्मवीर संघाने ८-१६ अशा गुणांनी ८ गुणांची आघाडी घेतली. तसेच दुसर्‍या डावात ३-२२ अशी निर्णायक आघाडी घेवून धर्मवीर संघ बाळेवाडी संघाने विजयी सलामी दिली. तर महिला गटातील सामना शिवप्रताप संघ पुणे आणि शिवतेज संघ हडपसर यांच्यात रागाला यात पहिल्या डावात शिवप्रताप संघाने २२-११ अशी आघाडी घेतली अटीतटीच्या दुसर्‍या डावात शिवप्रताप संघाने १६-२० अशा गुणांनी सामना जिकला. तसेच इतर सामन्यात अभिजीतदादा क्रीडा प्रतिष्ठान विरुद्ध मोरया संघ लवले यांच्यात झालेल्या  सामन्यात पहिला डाव २३-१० दूसरा डाव १०-१० अशा गुणांनी अभिजीतदादा क्रीडा प्रतिष्ठान विजयी झाली, तर शिवशक्ती पिंपरी विरुद्ध क्रांती क्रीडा मंडल यासंन्यात पहिला डाव १३-२३  दूसरा डाव ९-२१ या गुणांनी क्रांती क्रीडा संघाने विजयाला गवसणी घातली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com