सोलापूर महामार्गावर अपघाताचा धोका

solapur-highway
solapur-highway

मांजरी - येथील पुणे -सोलापूर महामार्गावर गेली काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात ड्रेनेजचे पाणी वाहत आहे. तसेच याच मार्गावर ग्रामपंचायतने भर रस्त्यावर कचरा कुंड्या मांडल्या आहेत. त्यामुळे या परिसरात अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. 
महामार्गावर मांजरी स्टडफार्म परिसरात शहरात येणाऱ्या महामार्गालगत असलेले पावसाळी ड्रेनेज तुंबल्यामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे. तसेच येथे चिखलही पसरला आहे. जवळच ग्रामपंचायतने भर महामार्गावर कचरा कुंड्या मांडल्या आहेत.

रात्रीच्या वेळी हे पाणी व कुंड्या वाहन चालकांच्या लक्षात येत नसल्याने दररोज येथे अपघाती परिस्थिती निर्माण होत आहे. दुचाकी घसरूनही छोटे-छोटे अपघात होत आहे. घाणीच्या साम्राज्यामुळे डास, माशा व दुर्गंधीचा त्रास स्थानिक नागरिकांसह प्रवाशांनाही सहन करावा लागत आहे. राष्ट्रीय महामार्ग विभाग, मांजरी ग्रामपंचायत यांच्याकडे तक्रार करूनही त्याबाबत कारवाई होत नसल्याची तक्रार नागरीकांनी केली आहे.

""परिसरातील पाच-सहा सोसायट्यांनी माहमार्गाच्या पावसाळी गटार वाहिनीत ड्रेनेजचे पाणी सोडले आहे. त्यामधील कचऱ्याने वाहिनी तुंबल्याने त्यातील पाणी रस्त्यावर वाहत आहे. तसेच ग्रांपंचायतकडून थेट रस्त्यात कचरा कुंड्या ठेवल्या आहेत. त्यामुळे येथे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. सोसायट्यांच्या ड्रेनेजच्या पाण्याची व्यवस्था करावी, कचराकुंड्या रस्त्यातून हटवाव्यात, याबाबत ग्रामपंचायतला पत्र दिले आहे. ''
- अशोक गिरमे, शाखा अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग, पुणे.

"ग्रामसेवकांना त्याठिकाणच्या परिस्थितीची पाहणी करून कार्यवाही करण्यास सांगितले आहे.  संबंधीत सोसायट्यांनी महामार्गाच्या पावसाळी वाहिनीत ड्रेनेज सोडले असल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल. कचरा कुंड्या महामार्गातून हलविण्यासही सांगितले आहे.''
- संजय जाधव, प्रशासक, 
मांजरी बु्द्रुक ग्रामपंचायत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com