जमीन नावावर केली नाही म्हणून बापाला मारहाण

चिंतामणी क्षीरसागर
शनिवार, 8 जुलै 2017

पोलिसांनी वडिलांच्या तक्रारीवरून मुलगा व बायकोवर मारहाणीचा गुन्हा नोंदवला आहे. कोऱ्हाळे खुर्द ता. बारामती येथील यशवंत मारूती पवार, मालन मारूती पवार अशी बापाला मारहाण करणाऱ्या मुलगा व बायकोची नावे असून मारूती बाबुराव पवार (वय 72) यांनी वडगाव निंबाळकर पोलीसांकडे फिर्याद दाखल केली आहे.

वडगाव निंबाळकर : जमीन नावावर का करीत नाही. या कारणावरून लेकाने व बायकोने वृद्धास बेदम मारहाण केल्याची घटना शुक्रवारी कोऱ्हाळे खुर्द (ता. बारामती) येथे घडली.

पोलिसांनी वडिलांच्या तक्रारीवरून मुलगा व बायकोवर मारहाणीचा गुन्हा नोंदवला आहे. कोऱ्हाळे खुर्द ता. बारामती येथील यशवंत मारूती पवार, मालन मारूती पवार अशी बापाला मारहाण करणाऱ्या मुलगा व बायकोची नावे असून मारूती बाबुराव पवार (वय 72) यांनी वडगाव निंबाळकर पोलीसांकडे फिर्याद दाखल केली आहे.

मारूती यांना दोन मुले आहेत. एकुन साडेतीन एकर जमिनी पैकी दोन्ही मुलांना प्रत्येकी पावणेदोन एकर जमीन तोंडी कसायला दिली आहे. कागदपत्रावर अद्याप मुलांची नावे नाहीत. मोठा मुलगा युवराजकडे तर आई आरोपी यशवंतकडे राहला आहे. वडील घराजवळ झाडाखाली झोपले असता यशवंत येथे आला कागदोपत्री तुन्ही आमच्या नावावर जमीन का करीत नाही असा जाब वडिलांना विचारत होता.

तुझ्या मामाला घेउन ये नातेवाईकांसमोर प्रश्न मिटवू असे वडिलांनी सांगितल्याने चिडुन जाउन वृद्ध बाप मारूती यांना मुलगा यशवंत व बायको मालन दोघांनी हाताने काठीने मारले. यामधे मारूती जखमी झाले आरडा ओरडा केल्याने त्यांची सुटका झाली. वडिल जखमी झाल्याचे पाहुन यशवंत व मालन दोघेही पळुन गेले. या घटनेचा अधिक तपास रमेश निकम करीत आहेत अशी माहिती ठाणे अंमलदार रामदास केचे यांनी दिली.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा -
आजीबाईंना भेटला जिल्ह्याधिकाऱ्यांच्या रूपात श्रावण बाळ !​
भारतातील चिनी नागरिकांना चीनकडून "सावधगिरीचा इशारा'
येरवडा कारागृहात कैद्यानेच केला कैद्याचा खून​
नितेश राणेंचे आंदोलन म्हणजे केवळ फालतूपणा: विनायक राऊत​
सावंतवाडीत सापडली लाल भडक नानेटी
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळली पाच फूटांची मगर
कोणी न्याय देता का न्याय', वृद्ध दांपत्याची आर्त हाक​
गोंदिया: गोरेगाव तालुक्‍यातील 17 गावात महिलांना मिळणार सरपंच होण्याची संधी​
तरुणाईच्या कंडिशन्स (नवा चित्रपट : कंडिशन्स अप्लाय...अटी लागू )​
नात्यांचं भावनिक हृदयांतर (नवा  चित्रपट : हृदयांतर )​
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वर्चस्वाचा भारतीय महिलांचा पूर्ण निर्धार​
नाशिक सायकलिस्ट फाऊंडेशनचे अध्यक्ष जसपालसिंग बिरदी यांचे निधन​
शिक्षकांच्या दुर्लक्षामुळे सहा वर्षाचा विद्यार्थी शाळेतील वर्गखोलीत तीन तास बंद​

टॅग्स