पुणेः कालव्यात मुलगा बुडाला; शोध सुरू

संदीप जगदाळे
शुक्रवार, 26 मे 2017

पुणे (हडपसर): लक्ष्मी कॅालनी येथून वाहणा-या कालव्यात 16 वर्षाचा मुलगा बुडाला. आग्नीशामक दलाल्या कर्मचा-यांकडून त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो मिळून आला नाही. हि घटना आज (शुक्रवार) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडली.

दिशेन प्रेमकुमार पनीकर (वय 16, रा. पंधरानंबर, हडपसर) असे बुडालेल्या मुलाचे नाव आहे. दिनेश आपल्या 14 वर्षाच्या लहान भाऊ व मित्रासोबत नवीन मुळा-मुठा कालव्यावर गेला. कालव्यात पाय टाकून तो बसला होता. उठताना त्याचा पाय घसरून तो कालव्यात बुडाला. मित्रांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला, मात्र अपयश आले. त्यांनी मदतीसाठी याचना केली, मात्र सकाळची वेळ असल्याने तेथे कोणीही नसल्याने त्यांना मदत मिळू शकली नाही. कालव्यातून मोठया क्षमतेने पाणी वाहत असल्याने तो बुडाल्यानंतर पून्हा वर आलाच नाही.

घटलेली हकीगत त्यांनी घरी सांगितली. त्यानंतर आग्निशामक कर्मचारी व पोलिसांनी त्याचा शोध घेतला. मात्र, दुपारी दोन पर्यंत तो मिळून न आल्याने शोध मोहिम थांबविण्यात आली. दिनेश याने नुकतीच सतरा नंबरचा फॅार्म भरून दहावीची परीक्षा दिली होती. त्याचे वडील टायर पंक्चर काढण्याचे काम करतात, तर आई गृहिणी आहे.

मोदी सरकारच्या त्रिवर्षपूर्तीविषयी आणखी वाचा: