आदिवासी कातकरी कुटुंबातील रोहन बांबू उडीत राज्यपातळीवर प्रथम

दत्ता म्हसकर
मंगळवार, 31 ऑक्टोबर 2017

रोहन चव्हाण याला सुवर्णपदक

जुन्नर : गोळेगांव ता.जुन्नर येथील सर्वसामान्य आदिवासी कातकरी कुटुंबातील रोहन चव्हाण याने बांबू उडी स्पर्धेत राज्यपातळीवर प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णपदकाचा मानकरी ठरला आहे. श्री लेण्याद्री गणपती देवस्थान चे विश्वस्त जितेंद्र बिडवई यांनी रोहनचा गोळेगावच्या वतीने सत्कार केला तसेच त्याला राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. 

रोहन हा कृष्णराव मुंढे विद्यालयात शिकत असून त्याला मार्गदर्शन करणारे त्याचे क्रीडा शिक्षक डी. एम. चव्हाण सर यांनी त्याला मार्गदर्शन केले. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत असताना रोहनला खेळाची आवड असल्याने सरांनी त्याला प्रोत्साहन दिले यामुळे तो हे यश संपादन करू शकला असल्याचे बिडवई यांनी सांगितले.

तो राष्ट्रीय पातळीवरील खेळासाठी भोपाळला जाणार आहे. यावेळी त्याच्या शाळेतील मुख्याध्यापक फुलसुंदर सर, क्रीडा शिक्षक चव्हाण सर, पाटे सर, चौधरी सर व कवडे सर यांनी देखील त्याचे अभिनंदन केले. रोहन याचा बिडवई व मान्यवरांनी सत्कार केला.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :

टॅग्स