टेकडीफोड, स्टोन क्रशरचा धोका

टेकडीफोड, स्टोन क्रशरचा धोका

पुणे - पुणे शहराला ऑक्‍सिजन देणाऱ्या टेकड्यांवर वाढलेली सिमेंटची जंगले आणि त्यासाठी झालेली टेकडीफोड, स्टोन क्रशर यामुळे वातावरणात वेगाने धूलिकण पसरून मानवी आरोग्याला धोका निर्माण होत आहे. टेकडीफोड रोखण्यात जिल्हा प्रशासनाला नेहमी येणारे अपयशही मानवी धोक्‍यास कारणीभूत ठरत आहे. 

शहराभोवतालच्या टेकड्या या वनीकरण क्षेत्रात येतात; परंतु गेल्या काही वर्षांत जिल्हा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या टेकड्यांची बेसुमार लचकेतोड झाली. त्यावर वृक्षारोपण करणे सोडाच; तेथील वृक्षांची कत्तल करून मोठ्या प्रमाणात बांधकामे उभी राहिली आहेत. आता या टेकड्या पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाच्या नियंत्रणाखाली असल्या, तरी पूर्वी टेकडीफोड आणि त्यावर झालेली बांधकामे रोखण्याची जबाबदारी ही जिल्हाधिकाऱ्यांची होती; पण कात्रजसह शहरालगतच्या भागातील टेकड्यांची पाहणी 

कठोर नियमावलीची गरज 
धूलिकणांचा केवळ मानवी जीवनावरच नाही, तर झाडांवरही दुष्परिणाम होतो. हवेत धूलिकण वाढले, की ते झाडांच्या पानांवर साठून राहतात. त्यामुळे पानांची प्रकाश संश्‍लेषणाची प्रक्रिया थांबते आणि झाडे मरण्याचे प्रमाण वाढते. पर्यावरणासाठी हा तर मोठा धोका आहे. पर्यावरणाचा होणारा हा ऱ्हास रोखण्यासाठी स्टोन क्रशर वा खाणी यांना शहरापासून किती किलोमीटर अंतरावर परवानगी असावी, याचे कठोर नियम तयार झाले पाहिजेत.

वाघोली परिसरात स्टोन क्रशरची संख्या अधिक आहे; परंतु काही ठिकाणी नियमभंगाची कारवाई केलेली आहे. स्टोन क्रशरच्या परिसरात झाडे लावणे, पाण्याचे फवारे मारणे, याची सक्‍ती केली जाते. नियमभंग करणारे क्रशर बंद करण्याची कारवाईदेखील केली जाते. धूलिकणांचे हवेत मिसळण्याचे प्रमाण मर्यादेत राहण्यासाठी मंडळ प्रयत्न करत असते.
- जे. एस. साळुंखे, सहायक प्रादेशिक अधिकारी, राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com