‘एनसीईआरटी’ मुलांना देणार ‘स्पर्शज्ञान’

मंगेश महाले
गुरुवार, 5 ऑक्टोबर 2017

पुणे - ‘चांगला आणि वाईट स्पर्श’ (गुड टच ॲण्ड बॅड टच) कसा असतो, हा शालेय मुलांना माहित व्हावे, यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था (एनसीईआरटी) येत्या शैक्षणिक वर्षापासून आपल्या सर्व पुस्तकांमध्ये याबाबतची माहिती चित्रांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना देणार आहे. 

पुस्तकांच्या शेवटच्या पानाच्या आतील भागात लैंगिक छळापासून कसे सावध राहायचे, याची माहिती  विद्यार्थ्यांना मिळणार आहे. विद्यार्थ्यांना समजेल अशा सरळ सोप्या भाषेत ही माहिती असून चित्रांच्या माध्यमातून चांगला आणि वाईट स्पर्श याबाबत सांगितले जाणार आहे. 

देशात बाललैंगिक प्रकरणांमध्ये वाढ होत आहे. यामुळे राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्थेने (एनसीईआरटी) येत्या शैक्षणिक वर्षापासून आपल्या पुस्तकांमध्ये याविषयीची माहिती विद्यार्थांना देण्याचा निर्णय घेतला आहे. कोणी वाईट स्पर्श करीत असेल तर त्यापासून आपला बचाव कसा करायचा याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. 

लैंगिक छळ प्रकरणात काय केले पाहिजे, सावधानगिरी कशी बाळगायची याविषयी सविस्तर माहिती पुस्तकात असेल. बाललैंगिक कायदा, राष्ट्रीय बाल सुरक्षा अधिकार, चाइल्ड हेल्पलाइनचे क्रमांक यांचा समावेश पुस्तकात करण्यात आला आहे. केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाने दिलेला याबाबतचा प्रस्ताव एनसीईआरटीने स्वीकारला आहे. मुलांच्या कुंटुबीयांना आणि शिक्षकांना मुलांना चांगल्या व वाईट स्पर्शाबाबत कशी माहिती द्यायची याबाबतचे प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. अशा प्रकरणात बहुसंख्य वेळा त्यांना नेमके काय करायचे हे समजत नाही, यासाठी याचा समावेश पुस्तकात करण्यात आला. 

सुचविलले बदल एका महिन्यात पूर्ण करण्यात येणार आहेत. त्यानंतर त्यांची प्रिंटिंग सुरू होणार आहे. ही नवीन पुस्तके येत्या शैक्षणिक वर्षापासून लागू होतील. शैक्षणिक वर्ष सुरू होण्याअगोदरच ही पुस्तके विद्यार्थ्यांच्या हाती पडणार आहेत. आतापर्यंत एनसीईआरटीला दोन कोटी पुस्तकांची आर्डर मिळाली आहे. अजून अनेक शाळांची आर्डर मिळालेली नाही. पुस्तकांची वाढलेली मागणी लक्षात घेता एनसीईआरटीने प्रिंटिंग आणि आपल्या पुस्तकविक्रेत्यांची संख्या वाढविली आहे.

नोटाबंदी, जीएसटी, स्वच्छता अभियानाची माहिती
एनसीईआरटी केंद्र राज्यातील शाळांची पाठ्यपुस्तके तयार करते. शिक्षणाविषयी धोरण ठरविण्याचे प्रस्ताव तयार करते. सध्या जी पुस्तके आहेत ती २००७ मध्ये तयार करण्यात आली होती. दहा वर्षांनी एनसीईआरटी आपल्या एकूण १८२ पुस्तकांची पुनर्रचना (अपडेट) करीत आहे. या माध्यमातून १३३४ बदल करण्यात येणार आहेत. यात नोटाबंदी, जीएसटी, बेटी बचाओ, बेटी पढाओ, स्वच्छता अभियान आदींचा समावेश करण्यात आला आहे.