पतीच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 ऑगस्ट 2017

नूतन रूपेश धुमाळ (वय 32, रा. हडपसर) असे मृत महिलेचे नाव आहे. रूपेश बबनराव धुमाळ (वय 36, रा. काळेपडळ, हडपसर) असे पतीचे नाव आहे. या दांपत्याला दोन मुली आहेत

पुणे - पतीच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना हडपसर येथील काळेपडळ परिसरात रविवारी घडली. याप्रकरणी पतीविरुद्ध हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

नूतन रूपेश धुमाळ (वय 32, रा. हडपसर) असे मृत महिलेचे नाव आहे. रूपेश बबनराव धुमाळ (वय 36, रा. काळेपडळ, हडपसर) असे पतीचे नाव आहे. या दांपत्याला दोन मुली आहेत. याप्रकरणी मृत विवाहितेची आई शैलजा गुरव (रा. पोदेगाव, ता. जि. सातारा) यांनी फिर्याद दिली.