पुण्यात महिलेची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या

बाबा तारे
शनिवार, 9 सप्टेंबर 2017

औंध (पुणे): सेनापती बापट रस्ता येथे एका महिलेने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना आज (शनिवार) सायंकाळी सहाच्या सुमारास घडली.

औंध (पुणे): सेनापती बापट रस्ता येथे एका महिलेने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना आज (शनिवार) सायंकाळी सहाच्या सुमारास घडली.

सेनापती बापट रस्ता येथिल मॅरीयट हॉटेल समोर असलेल्या साई कॅपीटल या इमारतीवरून उडी मारून या महिलेने आत्महत्या केली असून आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. आश्विनी सुनील लोणकर (वय 32 वर्षे रा. हडपसर) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. ती हडपसर भागात राहणारी विवाहीत असून, तिचे माहेर कसबापेठ येथील असल्याचे पोलिसांनी सांगितले. ती या इमारतीत कुठे कामाला होती की इतर काही कारणासाठी आली होती याचा तपास चतु:श्रूंगी पोलिस ठाणे अंतर्गत असलेल्या जनवाडी पोलिस करत आहेत.