‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’ची ‘समर यूथ समिट’ उद्यापासून

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 जून 2017

पुणे - करिअरचे असंख्य पर्याय उपलब्ध होत असताना, यशाच्या वाटा शोधणाऱ्या तरुणांसाठी विविध क्षेत्रांमध्ये यशस्वी ठरलेल्या व्यक्तींबरोबर थेट संवाद साधण्याची संधी ‘डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन’च्या ‘यंग इंस्पिरेटर्स नेटवर्क’ (यिन) व्यासपीठाने आणली आहे. 

युवकांसाठी ‘यिन’ करत असलेल्या उपक्रमांचा भाग म्हणून होणाऱ्या तीन दिवसांच्या ‘यिन समर यूथ समिट २०१७’ मध्ये उद्योग, राजकारण, डिजिटल ऑनलाइन मार्केटिंग, टीम बिल्डिंग, शेअर मार्केट, स्टार्ट अप, खेळ, नवीन तंत्रज्ञान आदी विषयांवर चर्चा होणार आहेत. शिबिर सलग तीन दिवस सकाळी नऊ ते सायंकाळी सात या वेळेत तीन सत्रांत होईल.

बावधन येथील सूर्यदत्ता इन्स्टिट्यूटच्या प्रांगणात होणाऱ्या ‘समिट’चे उद्‌घाटन शनिवारी (ता. ३) सकाळी ११ वाजता होणार आहे. तीन दिवसांत होणाऱ्या सत्रांमध्ये निलय मेहता, सुनील पाटील, दीपक शिकारपूर, सुजय खांडगे, विशाल तांबे, रोहित पवार, श्रेयस जाधव, अभिजित कटके, आशिष दालिया, अनिल लांबा, सचिन बुर्गाटे आदी नामवंत सहभागी होणार आहेत. तसेच, देश-विदेशातील अन्य तज्ञही व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. पदवीचे शिक्षण घेणाऱ्या राज्यभरातील तरुणांना उन्हाळ्याच्या सुटीचा सदुपयोग करत शैक्षणिक, सामाजिक व व्यावसायिक विकासावर लक्ष केंद्रित करता यावे यासाठी गेल्या दोन वर्षांपासून ‘समर यूथ समिट’ मोलाची भूमिका बजावत आहे. ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’च्या ‘यिन समर यूथ समिट २०१७’साठी ‘स्पेक्‍ट्रम ॲकॅडमी’ मुख्य प्रायोजक, ‘निलया ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट’ प्रायोजक आणि ‘सीड इन्फोटेक’, ‘सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट’ आणि ‘युगांत फूड्‌स अँड बेव्हरेज’ सहप्रायोजक आहेत.

प्रथम येणाऱ्यास प्राधान्य

समीटमध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी शुक्रवारी (ता. २) सायंकाळी ६ वाजेपर्यंत ‘सकाळ’च्या स्थानिक कार्यालयाशी संपर्क साधावा. या समिटसाठी ‘यिन’ सदस्यांसाठी प्रत्येकी रुपये २०० रुपये तर सदस्येतरांसाठी प्रत्येकी रुपये ४०० शुल्क आहे. 

भोजन, निवासाची सोय

शिबिरात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांची भोजन व्यवस्था केली जाणार आहे. आवश्‍यकतेप्रमाणे निवासाची व्यवस्थाही केली जाईल. तसेच, सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाणार आहेत. मर्यादित जागा असल्याने प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर नोंदणी केली जाईल.

पुणे

पुणे - बाजीराव रस्त्यावर पोलिस वाहतूक शाखेने "नो पार्किंग'चे फलक लावले आहेत. मात्र, जेथे फलक लावले तेथेच बेशिस्त चालक वाहने...

06.03 AM

पुणे - "स्मार्ट सिटी', "स्मार्ट मोबिलिटी' आणि "इंटरनेट ऑफ थिंग्ज' (आयओटी) या क्षेत्रातील स्टार्टअप्सला तंत्रज्ञानासह सर्व...

05.21 AM

पुणे - शहरातील ‘प्रीमियम’ (मोक्‍याची जागा) व्यावसायिक मालमत्तांची उपलब्धता आणि ती मिळण्याचे प्रमाण निम्म्याने कमी झाल्याचे...

05.00 AM