धार्मिक सलोख्यातून सामाजिक, आर्थिक उन्नती घडवावी- वळसे पाटील

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 16 जुलै 2017

मलठण (ता. शिरूर) येथील मुस्लिम कब्रस्थानच्या कामासाठी 10 लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला. मुस्लिम समाजातिल 39 गावामधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

टाकळी हाजी : राज्यात अल्पसंख्याक समाज धार्मिक कार्यात एकत्रित आल्यानेच हिंदू मुस्लिम बांधवाची एकता पहावयास मिळते. सर्व जातिधर्मांच्या विचारांच्या लोकांना एकत्रित आणून समाज घडविण्याबरोबर आर्थिक उन्नती घडवायची हे कार्य महत्वाचे आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सत्तेत असताना विविध उपक्रमांच्या माध्यमातून मुस्लिम समाजाची प्रगती साधली. असे प्रतीपादन विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी केले. 

मलठण (ता. शिरूर) येथील राजयोग मंगल कार्यालयात राष्ट्रवादी पक्षाअंतर्गत रमजान ईद निमित्त ईद मिलन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी आमदार पोपटराव गावडे, भिमाशंकर कारखान्याचे माजी अध्यक्ष देवदत्त निकम, युवक राष्ट्रवादी कॅाग्रसेचे जिल्हाध्यक्ष मानसींग पाचुंदकर, घोडगंगा कारखान्याचे उपाध्यक्ष प्रकाश पवार, भिमाशंकर कारखान्याचे संचालक प्रदीप वळसे पाटील, सभापती सुभाष उमाप, जिल्हा परिषद सदस्य सुनीता गावडे, सवीता बगाटे, राजेंद्र गावडे, रंगनाथ थोरात, भाऊसाहेब शिंदे, पंचायत समिती सदस्य अरूणा घोडे, राष्ट्रवादी कॅाग्रसेचे कार्याध्यक्ष बाळासाहेब भोर, दामुशेठ घोडे, योगेश थोरात, सुदाम इचके, दत्तात्रेय गायकवाड, राजू शेख, विलास थोरात, आर. के. मोमीन, सुरेश गायकवाड, दगडूभाई हवालदार, गनीभाई आत्तार, असीफ आत्तार, चांद इनामदार, आरबाज आत्तार, आसीफ तांबोळी, बन्सी घोडे, अबीद तांबोळी, अनिल शिंदे आदी ग्रामस्थ उपस्थीत होते. 

वळसे पाटील म्हणाले की, मुस्लिम समाजात शिक्षणाचा अभाव असल्याने मागासलेपणा दिसून येत आहे. मुस्लिम समाजाने मुलांना धार्मिक उर्दू भाषेत शिक्षण देताना स्पर्धात्मक युगातील भाषांचे ज्ञान द्यावे. 50 टक्के महिलांना समान हक्क असण्याबरोबर 50 टक्के अल्पसंख्याक लोकांना शिक्षणाच्या सुवीधा मिळाल्या पाहिजेत. प्रत्येक क्षेत्रात त्यांना प्रगतीच्या मार्गावर आणणे गरजेचे आहे. देशात अल्पसंख्याक वर्गात अंतर निर्माण करण्याचे काम काही राजकीय प्रवृत्ती करत आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून मुस्लिम समाजाच्या महत्वाच्या मागण्या पुर्ण करण्याची जबाबदारी पदाधिकाऱ्यांनी घ्यावी. असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.  या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मिनीनाथ गिते यांनी केले. सुत्रसंचालन संदीप गायकवाड यांनी केले. 

मलठण (ता. शिरूर) येथील मुस्लिम कब्रस्थानच्या कामासाठी 10 लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला. मुस्लिम समाजातिल 39 गावामधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियानात 2012-2013 व 2014-2015 या काळात राज्य शासनाचा पुरस्कार प्राप्त केल्याबद्दल दैनिक सकाळचे टाकळी हाजीचे बातमीदार युनूस तांबोळी यांना राष्ट्रवादी कॅाग्रेस पार्टी व मुस्लिम समाजाच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.