पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी पुढाकार घेऊ

सकाळ कार्यालय - दिवाळी स्नेहमेळाव्यात एकपात्री कलाकार मकरंद टिल्लू यांनी सादर केलेल्या हास्यप्रयोगात उत्स्फूर्तपणे सहभागी झालेल्या महापौर मुक्ता टिळक आणि विविध धर्मीय नागरिकांसमवेत गणेश मंडळाचे कार्यकर्ते.
सकाळ कार्यालय - दिवाळी स्नेहमेळाव्यात एकपात्री कलाकार मकरंद टिल्लू यांनी सादर केलेल्या हास्यप्रयोगात उत्स्फूर्तपणे सहभागी झालेल्या महापौर मुक्ता टिळक आणि विविध धर्मीय नागरिकांसमवेत गणेश मंडळाचे कार्यकर्ते.

पुणे - हसायचे जगण्यासाठी आणि हसता हसता आपल्यातील सकारात्मक ऊर्जेला चालना देत सामाजिक कार्याचा वसा जोपासायचा, असा संकल्प विविध धर्मीय नागरिक आणि गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी केला. ‘आम्ही पाणी वाचविणार. पाण्याचा अपव्यय टाळण्याबरोबरच गळती थांबविण्यासाठी जनजागृती करणार’ अशी प्रतिज्ञाही केली.

निमित्त होते ‘सकाळ’ कार्यालयात आयोजित दिवाळी स्नेहमेळाव्याचे. या वेळी गणेश मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध धर्मीय नागरिक उपस्थित होते. एकपात्री कलाकार मकरंद टिल्लू यांनी हास्यप्रयोगांतून उपस्थितांना खळखळून हसविले. सध्याच्या ताणतणावाच्या जीवनात हास्यकलेतून मनाचे, शरीराचे आरोग्य चांगले राहण्याबद्दल ‘सकाळ’ने आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे सर्वांनी कौतुक केले. कार्यकर्त्यांनी तणावमुक्त जीवनशैलीकरिता आवश्‍यक सूचना आणि करावयाचे प्रयोग समजून घेतले. हसता हसता समाजसेवेचे व्रत जोपण्यासाठीचा संकल्पही प्रत्येकजण करीत होता.

महापौर मुक्ता टिळक म्हणाल्या, ‘‘पुणे शहर गणेशोत्सवाचे ‘आयकॉन’ आहे. मंडळांच्या कार्यकर्त्यांमुळेच उत्सवाला ओळख मिळाली. हा गणेशोत्सव ग्लोबल होण्यासाठी प्रयत्न व्हावेत. एखादी संकल्पना घेऊन फुलविक्रेता ते कार्यकर्त्यांपर्यंत योजना कार्यान्वित व्हावी; तसेच समाजातून गरजूंपर्यंत अन्न पोचविण्याचा प्रयत्न मंडळांच्या कार्यकर्त्यांनी करावा.’’

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर म्हणाले, ‘‘सकारात्मक ऊर्जेतून जीवनात आनंद मिळतो, तर संवादातून चांगल्या विचारांची देवाण-घेवाण होत असते. असा संवाद घडवून आणणारा ‘सकाळ’ने आयोजित केलेला दिवाळी स्नेहमेळावा निश्‍चितच स्तुत्य उपक्रम आहे.’’

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई, वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. जी. अंबुरे, निरीक्षक अमृत मराठे, डॉ. शमसुद्दीन तांबोळी, डॉ. बेनझीर तांबोळी, संतसिंग मोखा, दलजितसिंग रॅंक, चरणजितसिंग सहानी, रेव्हरंड अनिल इनामदार, रेव्हरंड अजित फरांदे, सुधीर चांदेकर, विजयकुमार मर्लेचा, वालचंद संचेती, पोपटलाल ओस्तवाल, मुश्‍ताक पटेल, मुख्तार पटेल, मुहिब शेख, मोहिनुद्दीन सय्यद, अशपाक दिल्लीवाले यांच्यासह गणेशोत्सवाचे अभ्यासक आनंद सराफ, मंडळांचे पदाधिकारी राजाभाऊ टिकार, विवेक खटावकर, नितीन पंडित, अशोक गोडसे, महेश सूर्यवंशी, सूर्यकांत पाठक, श्‍याम मानकर, रवींद्र माळवदकर, संजय बालगुडे, बाळासाहेब मारणे, सुरेश पवार, रवींद्र रणधीर, शिरीष मोहिते, पीयूष शहा, पुष्कर तुळजापूरकर, प्रमोद कोंढरे, नीलेश वकील, भाई कात्रे, जया किराड, प्रवीण वडके, अंजलेश वडके, गिरीश पोटफोडे, सतीश साने, युवराज निंबाळकर, केशव क्षीरसागर, अर्जुन जानगवळी, दत्ता परदेशी, अजय डहाळे, विनायक धारणे, मनीषा धारणे, नीलेश शहा, श्‍याम परदेशी, राजपाल ठाकूर, निखिल धारप, आतिष मांडगे, अनिकेत गवळी, विक्रम खन्ना, रमेश परदेशी, शेखर साळुंके, योगेश फाळके, रसूल चितारी, धनंजय डिंबळे, अभय कुलकर्णी, कुमार शिंदे, रमेश मुलभारती, धनंजय मोरे, सचिन शेलार, विठ्ठल गायकवाड, सचिन धनकुडे आदी उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com