कर्जमाफीत किती शेतकऱ्यांना लाभ होईल?

रामदास वाडेकर
सोमवार, 25 सप्टेंबर 2017

शेतकऱ्यांना रब्बी व खरीप पिकासाठी वर्षातून एकदा कर्ज पुरवठा केला जातो. सबंधित कर्जदार शेतकऱ्यांनी मुदतीत कर्जाची परतफेड केली तर त्यांना मध्य मुदतीचे कर्ज देण्याची सुविधा आहे.

टाकवे बुद्रुक : कर्जमाफीचे श्रेय लाटण्यासाठी भारतीय जनता पक्षाने मोठी होर्डिग्ज, बॅनर व जाहिराती लावून सवंग प्रसिद्धी मिळाली, साखर व पेढे वाटून आनंदोत्सवही साजरा केला, परंतु कर्जमाफीसाठी जाचक अटी व नियम लावल्या, त्यातच ऑनलाईन अर्ज भरताना बळिराजा ही पिंजून गेला. प्रत्येक दिवशी नव्याने क्लिष्ट अर्ज शासनाकडून येत आहे. त्यामुळे यंदाच्या कर्जमाफीत किती शेतकऱ्यांना याचा कर्जमाफीचा लाभ होईल अशी शंका प्रश्न पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक बाळासाहेब नेवाळे यांनी उपस्थित केली.  

मावळातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत नेवाळे बोलत होते. सबंधित सर्व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या पद्धाधिकाऱ्यांसह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेतकऱ्यांना रब्बी व खरीप पिकासाठी वर्षातून एकदा कर्ज पुरवठा केला जातो. सबंधित कर्जदार शेतकऱ्यांनी मुदतीत कर्जाची परतफेड केली तर त्यांना मध्य मुदतीचे कर्ज देण्याची सुविधा आहे. त्यामुळे एका वर्षात शेतकऱ्यांना तीन वेळा कर्ज पुरवठा करणाऱ्या विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या मार्फत दिला जातो.

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके शेतकऱ्यांना तीन लाख रूपया पर्यतचे कर्ज शून्य टक्के व्याजदराने देते, याचा शेतकऱ्यांनी लाभ घेतला पाहिजे असे सांगून नेवाळे म्हणाले, "शेतकरी पिक कर्ज घेऊन ते वेळेवर परतफेड केली करीत नाही, ही बाब संस्थेच्या अहिताची आहे. संस्था आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी कर्ज घेऊन ते वेळेवर भरणे गरजचे आहे. या पुढील काळात शेतकऱ्यांनी शेतीपूरक व्यवसायाची निवड करून फूलशेती, पाणी पुरवठा योजना, गाई म्हशीचा गोठा करण्यासाठी कर्ज पुरवठा सहकार्य करू असे आश्वासनही नेवाळेंनी दिले.

Web Title: pune news takve budruk farmers loan waiver