'निश्चय पक्का' असेल जगात काहीही असाध्य नाही

हरिभाऊ दिघे
मंगळवार, 29 ऑगस्ट 2017

राष्ट्रपती पदक विजेते भावेश भाटीया ; रोटरी नेत्र रुग्णालयाचा लोकार्पण सोहळा 

तळेगाव दिघे (जि. नगर) : "मानवी जीवनात संघर्ष अटळ असतो. जीवनात येणाऱ्या संकटांचा मुकाबला करण्यासाठी तिच संधी समजून त्यावर मात करण्याचा प्रयत्न केल्यास हमखास यश पदरी पडते. मनात निश्चय पक्का असेल आणि आत्मविश्वास प्रबळ असेल तर या जगात कोणतीही गोष्ट असाध्य नाही," असे प्रतिपादन अंधत्त्वावर मात करुन शेकडो दृष्टीहीनांच्या जीवनात प्रकाश निर्माण करणारे राष्ट्रपती पदक विजेते भावेश भाटिया यांनी केले.

संगमनेर रोटरी क्लब व रोटरी आय केअर ट्रस्टच्या दर्शन रोटरी नेत्र रुग्णालयाच्या नूतन इमारतीच्या लोकार्पण सोहळयात ते बोलत होते. आमदार बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, उद्योगपती राजेशजी मालपाणी मंचावर उपस्थित होते.

भाटिया म्हणाले की, माझ्या जीवनात मी कधीही अंधत्त्वाला अडसर मानले नाही. आत्मबळ वाढवण्यासाठी वेगवेगळया स्पर्धांच्या माध्यमातून अनेक बक्षिसे मिळविली. रोजीरोटीचा व्यवसाय करतांना हातगाडीवर मेणबत्त्या विकायचो. त्यातूनच  सनराईज कॅण्डल या उद्योगाची सुरुवात करता आली. आज या उद्योगाने शेकडों दृष्टीहीनांना रोजगारासह सन्मानाने जगण्याचा मार्ग दाखविल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले. जन्मताच अंधत्त्व पदरी पडलेल्या भाटियांना त्यांच्या पत्नीने मोलाची साथ दिल्याचा उल्लेखही त्यांनी यावेळी आवर्जुन केला. यावेळी त्यांना मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

आमदार थोरात म्हणाले, एखाद्या कारणासाठी हजारों लोक रस्त्यावर उतरतात, त्याऐवजी समाजोपयोगी कामांसाठी अशा हजारोंनी हातभार लावला तर अशा संस्था खुप मोठया होतील व अधिक जोमाने काम करतील. गेल्या २८ वर्षांपासून गरजू व निराधार रुग्णांसाठी अविरतपणे निरपेक्ष भावनेने काम करणाऱ्या रोटरी क्लबने आजवर हजारोंना नवदृष्टी देण्याचे काम केले आहे.

आमदार डॉ. तांबे, नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविकात ट्रस्टचे अध्यक्ष दिलीप मालपाणी यांनी गेल्या २७ वर्षांच्या प्रगतीचा आढावा घेतला. स्वच्छ, सुंदर व सर्व आधुनिक मशिनरी व तज्ज्ञ डॉक्टर असलेल्या हॉस्पिटलची परिपूर्ण माहिती त्यांनी उपस्थितांना दिली. मालपाणी उद्योग समुहाचे अध्यक्ष राजेश मालपाणी रोटरीच्या दृष्टीयज्ञाचा गौरव केला. संजय राठी यांनी भावेश भाटिया यांना दिलेल्या मानपत्राचे वाचन केले. स्वागत भारतभूषण नावंदर यांनी केले. सुत्रसंचलन अजित काकडे व राहुल कोकणे यांनी केले. आभार नरेंद्र चांडक यांनी मानले. 

पुणे

टाकळी हाजी (ता. शिरूर, जि. पुणे): अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने महाराष्ट्र राज्यात सगळीकडे पाऊस बरसत आहे. दोन ते...

04.18 PM

पुणे : "मुस्लिमधर्मीय पुरुष कायद्याचा उपयोग स्वतःच्या सुखप्राप्तीसाठी करत असताना...

11.12 AM

मंचर : वाळद (ता. खेड) येथे सायली निलेश शिंदे (वय ७) या मुलीला घरात खेळत असताना सोमवारी (ता.१८) संध्याकाळी पाच वाजता सर्पदंश झाला...

08.54 AM