शिक्षिकेला एक दिवसाची पोलिस कोठडी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 सप्टेंबर 2017

नवी सांगवी - अडीच वर्षांच्या मुलाला अमानुष मारहाण करणाऱ्या शिक्षिकेला सांगवी पोलिसांनी अखेर अटक केली असून, तिला एक दिवसाची कोठडी सुनावण्यात आली आहे. भाग्यश्री रवी पिल्ले ( वय २९, राहणार विल्यमनगर, पिंपळे गुरव) असे शिक्षिकेचे नाव असून, पोलिसांनी तिला अटक केली आहे. याबाबत चिमुरड्याची आई लक्ष्मी संतोषकुमार कश्‍यप यांनी पोलिसांत तक्रार दिली.

पिंपळेगुरव-भाऊनगर येथील कश्‍यप दांपत्यांचा अडीच वर्षांचा मुलगा देव भाग्यश्रीकडे सोमवारी (ता. ११) दुपारी चार वाजता शिकवणीला गेला. सायंकाळी सहा वाजता परत आल्यावर देवला अमानुष मारहाण झाल्याने निदर्शनास आले. यामुळे त्याच्या पालकांनी सांगवी पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी त्यांना रुग्णालयात उपचारासाठी चिठ्ठी दिली. तसेच उपचाराचे मेडिकल रिपोर्ट आल्यावर गुन्हा दाखल करू असे सांगितले. परंतु, हे कश्‍यप कुटुंबीय मुलाच्या मारहाणीमुळे भेदरून गेले होते. त्यानंतर पोलिसांनी देवच्या घरी धाव घेऊन त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले व त्यावर तातडीने उपचार सुरू केले. त्याचे वडील संतोष कश्‍यप यांच्याशी संपर्क साधला असता देवच्या डोक्‍याला चांगलाच मार लागल्याचे सांगितले. तोंडावरची सूज उतरण्यास वेळ लागणार असल्याचेही सांगितले.

Web Title: pune news teacher police custody