तापमानवाढीमुळे सीताफळ बाजारात 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 ऑक्टोबर 2017

पुणे - तापमानवाढीमुळे सीताफळ लवकर तयार होऊ लागली आहेत. त्यामुळे मार्केट यार्ड येथील फळ बाजारात त्याची आवक वाढली आहे. परिणामी, भावात घट झाली असली, तरी प्रक्रिया उद्योगाकडून खरेदी होत असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान टळले आहे. 

पुरंदर, बारामती, यवत, चाकण, राजगुरुनगरसह औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातून सीताफळांची आवक बाजारात होत आहे. रविवारी या हंगामातील सर्वांत मोठी 30 टन आवक झाली. त्यामुळे भावात 30 टक्‍क्‍यांची घट झाली. गेल्या आठवड्यात सीताफळाला प्रतीनुसार प्रतिकिलो 10 ते 250 रुपये इतका भाव मिळाला. या रविवारी हाच भाव 8 ते 150 रुपये इतका होता.  सध्या प्रतिदिन दहा टनइतकी आवक होत आहे. 

""बदललेल्या हवामानाचा हा परिणाम असून, तापमानवाढीमुळे सीताफळ लवकर तयार होऊ लागली आहेत. पाऊसही पडत असल्याने उत्पादनावर परिणाम होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सीताफळ विक्रीला पाठविली,'' असे व्यापारी युवराज काची यांनी सांगितले. 

सीताफळाचा हंगाम जून ते जानेवारीदरम्यान तीन बहरांत असतो. जून ते ऑक्‍टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर, अंतिम बहार हा जानेवारी आणि फेब्रुवारीचा असतो. कमी खर्चात पुरेसे उत्पादन देणारे फळ म्हणून सीताफळाची ओळख आहे. याला औषधे फवारणी आणि खतांसाठी फारसा खर्च नसतो. साधारणपणे एकरी 80 हजार ते दोन लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळते. 

वडकी येथील शेतकरी संभाजी गायकवाड यांनी 600 किलो सीताफळ विक्रीला आणले होते. ""भाव कमी मिळाला असला तरी नुकसान जास्त झाले नाही. किरकोळ विक्रेत्यांपेक्षा प्रक्रिया उद्योगाकडून मागणी असल्याने भाव टिकून राहिला नसता, तर आणखी नुकसान सोसावे लागले असते,'' असे त्यांनी नमूद केले. सीताफळ रबडी, आइस्क्रीम, पल्प तयार करण्यासाठी खरेदी होत आहे. 

Web Title: pune news temperature Custard Apple in market