पुण्यात दोघांकडून 4 मोटार सायकली 6 मोबाईल हस्तगत

संदीप जगदाळे
शनिवार, 27 मे 2017

पुणे (हडपसर): जबरी चोरी केल्याप्रकरणी दोन आरोपींना हडपसर पोलिसांनी २४ तासात अटक केली आहे. त्यांच्याकडून ४ मोटार सायकली व ६ मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत. एक आरोपी फरार असून दोघांना उद्यापर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

शंकर औंदूबर पकाले (वय २१, रा. पठारे वस्ती, लोणीकाळभोर, ता. हवेली, जि. पुणे) व खंडू अविनाश खराडे (वय २०, रेल्वे स्टेशनजवळ, लोणीकाळभोर, ता. हवेली) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी सुर्यकांत दत्तात्रय सुरवसे (वय ४०, रा. होळकरवाडी, ता. हवेली, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली होती.

हडपसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक विष्णू पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुरवसे हे रिक्षाचालक आहेत. नातेवाई सोलापूरहून येणार असल्याने २६ मे रोजी पहाटे अडीच वाजता त्यांना नेण्यासाठी ते सोलापूर रस्त्यावर संत तुकाराम महाराज पालखी विसावा ठिकाणी थांबले होते. यावेळी दुचाकीवरून आलेल्या चोरटयांनी त्यांच्या हातातील मोबाईल हिसकावून नेला. गुप्तहेरांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, त्याच दिवशी रात्री आठ वाजता दोघांना अटक केली. तपासात त्यांच्याकडून ५ मोबाईल स्मार्ट फोन, मुंढवा व हडपसर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून चोरलेल्या ४ चोरीच्या दुचाकी हस्त केल्या. शंकर याचे गॅरेज आहे तर खंडू प्लंबिंगची कामे करतो.

तपास पथकातील गुन्हे पोलिस निरिक्षक अंजूम बागवान, सहाय्यक पोलिस निरिक्षक हेमत पाटील, हवलदार राजेश नवले, युसुफ पठाण, सैदोबा भोजराव, राजू वेंगरे, प्रमोद टिळेकर, प्रताप गायकवाड, विनोद शिवले, गणेश दळवी, नितीन मुंढे, अमित कांबळे, अकबर शेख, दाउद सय्यद यांनी आरोपींना अटक करून त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त केला.

ताज्या बातम्याः