महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये चोरट्यांचा धुडगूस, मंगळसुत्रे चोरली

गुरुवार, 26 ऑक्टोबर 2017

सिग्नलला थांबलेल्या महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये चोरट्यांनी घुसून प्रवाशांसोबत धक्काबुक्की

पुणे : मुंबईवरून कोल्हापूरला येताना जेजुरीजवळ राजेवाडी येथे सिग्नलला थांबलेल्या महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये चोरट्यांनी घुसून प्रवाशांसोबत धक्काबुक्की केली. तसेच तीन महिलांचे मंगळसूत्र हिसकावून चोरटे पसार झाले.

ही घटना गुरुवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत मिरज आणि कोल्हापूर येथे संबंधित प्रवाशांनी तक्रार दिली आहे. रेल्वे क्रॉसिंगसाठी आऊटर सिग्नलला थांबल्यानंतर हा प्रकार घडला.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :