पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाच्या विकासासाठी प्रयत्न - पेगू

लष्कर - पुणे कँटोन्मेंट बोर्डातर्फे कॅस्टिलिनो रस्त्यावर (वाय जंक्‍शन) उभारण्यात येणाऱ्या पादचारी पुलाच्या कामाचे मंगळवारी उद्‌घाटन  करताना एल. के. पेगू. (डावीकडून) प्रियांका श्रीगिरी, डॉ.किरण मंत्री, अतुल गायकवाड, विवेक यादव, पेगू, डॉ. डी. एन. यादव, विनो
लष्कर - पुणे कँटोन्मेंट बोर्डातर्फे कॅस्टिलिनो रस्त्यावर (वाय जंक्‍शन) उभारण्यात येणाऱ्या पादचारी पुलाच्या कामाचे मंगळवारी उद्‌घाटन करताना एल. के. पेगू. (डावीकडून) प्रियांका श्रीगिरी, डॉ.किरण मंत्री, अतुल गायकवाड, विवेक यादव, पेगू, डॉ. डी. एन. यादव, विनो

पुणे - 'स्मार्ट कॅंटोन्मेंट अंतर्गत पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाने अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्प मागील दोन वर्षांमध्ये राबविले आहेत. त्यादृष्टीने काही दिवसांनी चांगल्या दर्जाच्या सोई-सुविधा कॅंटोन्मेंटमधील रहिवाशांना उपलब्ध होतील. भविष्यातही पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाच्या प्रकल्पांना गती मिळण्यासाठी प्रयत्न करू,’’ असे मत लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाच्या मालमत्ता विभागाचे महासंचालक एल. के. पेगू यांनी व्यक्त केले.

पुणे कॅंटोन्मेंट बोर्डातर्फे गोळीबार मैदानाकडून महात्मा गांधी बसस्थानकाकडे जाणाऱ्या कॅस्टिलिनो रस्त्यावर (वाय जंक्‍शन) पादचारी पूल उभारण्यात येत आहे. या कामाचा प्रारंभ पेगू यांच्या हस्ते झाला. या वेळी बोर्डाचे उपाध्यक्ष अतुल गायकवाड, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. डी. एन. यादव, सदस्य डॉ. किरण मंत्री, दिलीप गिरमकर, प्रियांका श्रीगिरी, विवेक यादव व विनोद मथुरावाला उपस्थित होते. याबरोबरच आझम कॅम्पस, अँग्लो उर्दू गर्ल्स हायस्कूल, सेंट अँथोनी स्कूल या शाळांमधील विद्यार्थी, शिक्षक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

पेगू म्हणाले, ‘‘नागरिकांना अधिकाधिक चांगल्या सोई-सुविधा देण्यासाठी कॅंटोन्मेंट बोर्ड प्रयत्नशील आहे. दोन वर्षांमध्ये अनेक प्रकल्प बोर्डाने पूर्ण केले आहेत. लवकरच हे प्रकल्पांचा लाभ नागरिकांना घेता येईल. मात्र नागरिकांनीही या सोई-सुविधांचा अतिशय जबाबदारीने वापर करावा.’’
गायकवाड म्हणाले, ‘‘कॅंटोन्मेंट परिसरातील तीस हजारांहून अधिक विद्यार्थी कॅस्टिलिनो रस्त्याच्या परिसरातील शाळा, महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत आहेत. त्यांना जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागत आहे. त्यामुळे कॅस्टिलिनो रस्त्यावर पादचारी पूल होणे महत्त्वाचे होते.’’ डॉ. यादव यांनी कॅंटोन्मेंट बोर्डातर्फे राबविण्यात आलेल्या विविध प्रकल्पांची माहिती दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com