तुषारच्या आयुष्यासाठी पित्याची दारोदार भटकंती

tushar gharge
tushar gharge

मूत्रपिंड रोपणासाठी आर्थिक मदतीचे आवाहन

निमगाव केतकी (पुणे) रेडा (ता. इंदापूर) येथील संगणक अभियंता तुषार तानाजी घारगे याच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या आहेत. त्याची आई सुनीता यांनी स्वतःची एक किडनी त्याला देण्याचा निर्णय घेतला आहे. ते दोघे 15 दिवसांपासून कोइमतूर येथील एका रुग्णालयात आहेत. मात्र आर्थिक स्थिती नाजूक असल्याने व मदत वेळेत मिळत नसल्याने मूत्रपिंड रोपण शस्त्रक्रिया लांबणीवर पडत आहे. तुषारचा जीव वाचविण्यासाठी आर्थिक मदत मिळविण्यासाठी त्याचे वडील दारोदार फिरत आहेत.

तुषारच्या शस्त्रक्रियेसाठी त्याचे वडील तानाजी घारगे हे आज निमगाव केतकी येथे आले होते. त्यांची सोमवारी भेट झाली. त्यांनी ही हकिगत सांगितली. ते म्हणाले, ""तुषारच्या शस्त्रक्रियेसाठी सहा लाख रुपयांची गरज आहे. आमची आर्थिक स्थिती नाजूक आहे. शासकीय मदतीसाठी पत्र दिले आहे. मात्र, अजून काहीच उत्तर मिळालेले नाही. त्याची किडनी लवकर बदलणे गरजेचे आहे, त्यामुळे त्याला व त्याच्या आईला कोइमतूर येथील कोव्ही मेडिकल सेंटर या हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. सहा लाख खात्यात दिसल्याशिवाय शस्त्रक्रिया होणार नाही. मागील पंधरा दिवसांपासून तालुक्‍याच्या विविध ठिकाणी गेल्यानंतर पंचवीस हजार रुपयांची मदत त्यांना मिळाली आहे.

सरकारी मदत कधी मिळणार? ती मिळते की नाही म्हणून तालुक्‍यात फिरून पैसे जमवत असल्याचे त्यांनी सांगितले. समाजातील दानशूर व्यक्ती व संस्था यांनी मदत केल्यास माझ्या मुलाचे आयुष्य पुन्हा उभा राहू शकते, त्यासाठी मदत करावी, असे आवाहन ते करत आहेत.

मदत बॅंक ऑफ इंडियाच्या इंदापूर शाखेतील खाते क्रमांक 062210110000474 मध्ये जमा करावी. त्याचा आयएफएससी कोड बीकेआयडी 0000622 असा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com