औंध येथे गॅस स्फोटात दोन कामगार जखमी

औंध येथे गॅस स्फोटात दोन कामगार जखमी
औंध येथे गॅस स्फोटात दोन कामगार जखमी

औंध (पुणे): औंध डीपी रस्ता येथील डॉ. आंबेडकर वसाहतीत ओम साई गॅस दुरूस्तीच्या दुकानात अनधिकृतपणे राजरोस गॅस भरला जात असताना आज (गुरुवार) दुपारी सव्वा बाराच्या सुमारास गॅसचा स्फोट झाला. यात दोन कामगार भाजल्याने जखमी झाले असून, त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.

शशिकांत शिंदे नावाच्या व्यक्तीने आपला गाळा परमेश्वर वल्लीपुरे यास भाड्याने दिला आहे. या दुकानात वरच्या मजल्यावर अनधिकृतपणे गॅस भरून काळ्या बाजारात विकला जात होता. नियमीतपणे हा गोरखधंदा चालू असताना अन्न पुरवठा विभागाने मात्र या प्रकाराकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. या दुकानात यापुर्वीही अशीच दुर्घटना घडली होती. परंतु, किरकोळ बाब असल्याने हा प्रकार उजेडात आला नाही.

आज रोजच्याप्रमाणेच दोन कामगार मोठ्या टाकीतील गॅस लहान टाकीत भरत असतांना स्फोट झाला. यावेळी या स्फोटामुळे परिसरात मोठा आवाज झाला व दुकानातील पत्रे व छत फुटले. यात दोन कामगार जखमी झाले असून, एकाचा चेहरा गंभीर भाजला आहे. एकाला पाठीला मार लागून भाजला आहे. या घटनेची माहिती कळताच औंध अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी जखमींना तात्काळ रूग्णालयात दाखल करण्यात पुढाकार घेतला.

जवानांच्या तत्परतेने येथील पुढील अनर्थ टळला. पुढील चौकशी औंध पोलिस करत आहेत. एवढी मोठी घटना घडूनही दोन तास अन्न पुरवठा अधिकारी जागेवर फिरकले नाही. दोन तासानंतर घटनास्थळी येऊन संबंधित अधिकारी यांनी पंचनामा करून ऐवज ताब्यात घेण्याची प्रक्रिया राबवली. परंतु, स्थानिक नागरिकांनी जोपर्यंत हलगर्जी करणा-यांना निलंबीत करणार नाही, तोपर्यंत मुद्देमाल ताब्यात घेऊ देणार नसल्याचा पावित्रा घेतल्याने वातावरण गंभीर झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com