बाप्पासाठी बनवा उकडीचे मोदक

बाप्पासाठी बनवा उकडीचे मोदक

पुणे - सकाळ मधुरांगण व बिग बझारतर्फे गणेशोत्सवानिमित्त उकडीचे मोदक आणि सुरळीची वडी तयार करण्याची कार्यशाळा पुण्यात रविवारी (ता. २०), तर पिंपरी चिंचवडमध्ये सोमवारी (ता. २१) घेण्यात येणार आहे. या वेळी उकडीचे मोदक बनविण्याची स्पर्धा होणार आहे.

या कार्यक्रमात जे मधुरांगणचे सभासद होतील, त्यांना मेघा गृहिणी उद्योग यांच्यातर्फे सव्वा किलोची मेगा मल्टिपर्पज आकर्षक बॅग रु. १०० हून अधिक किमतीची गिफ्ट म्हणून मिळणार आहे. मेगा बॅगमध्ये पालेभाज्या १०-१२ दिवस ताज्या राहतात.  

कार्यशाळेत पाकतज्ज्ञ अनुराधा केळकर मार्गदर्शन करतील. उकड कशी तयार करावी, मोदक कसे बनवावेत, सारण बनविण्याचे योग्य प्रमाण, सोप्या पद्धतीने मोदक व सुरळीची वडी कशी बनवावी या सर्व गोष्टी शिकवल्या जातील. यामध्ये रेसिपी प्रिंट आउट्‌स विकत मिळतील. सभासदांना प्रवेश विनामूल्य, फोनवर नावनोंदणी आवश्‍यक. सदस्येतर महिलांसाठी ६५० रु. शुल्क.  मधुरांगण सभासद नोंदणी एक तास आधी बिग बझारमध्ये करावी.

कार्यशाळेचे वेळापत्रक
रविवार (ता. २०) बिग बझार, कोथरूड सिटी प्राइडच्या शेजारी. दु. २ वा.
सोमवार (ता. २१) बिग बझार, ॲडलॅब्स सिनेमा बिल्डिंगमध्ये चिंचवड. दु. २ वा.
बिग बझारतर्फे विजयी स्पर्धकांना प्रथम क्रमांकासाठी रु. ७०००, द्वितीय रु. ५०००, तृतीय रु. ३०००, गिफ्ट व्हाउचर, तर उत्तेजनार्थ आकर्षक बक्षीस देण्यात येईल. स्पर्धकांनी कार्यक्रमाच्या अर्धा तास आधी येणे अपेक्षित आहे. संपर्क - ९०७५०१११४२, ८३७८९९४०७६

स्पर्धेचे नियम 
स्पर्धेला येताना एका कागदावर रेसिपीसाठीचा वेळ, साहित्य, खर्च, किती जणांसाठी बनविली असे लिहून आणावे. तसेच, कागदावर आपले नाव न लिहिता आपल्या फॉर्ममधील नोंदणी क्रमांक मोठ्या अक्षरांत लिहावा. 
 रेसिपी टेबलवर मांडताना डिस्पोजेबल वस्तूमधून सादर करावी, कारण कोणतीही वस्तू परत मिळणार नाही, याची नोंद घ्यावी. 

मोदक हा नावीन्यपूर्ण किंवा पारंपरिक असावा, तिखट किंवा गोड असावा. रेसिपी फक्‍त २ व्यक्तींपुरतीच असावी. 

या स्पर्धेमध्ये सजावटीला महत्त्व न देता रेसिपीची चव, वापरलेले पदार्थ, करण्याची पद्धत/ कृती, तसेच वस्तूंचे प्रमाण, नावीन्यता या गोष्टींचा परीक्षणात विचार होईल. 

स्पर्धकांनी स्पर्धेच्या ठिकाणी १.३० ते २ या वेळेमध्ये आपल्या रेसिपी मांडून रेसिपी शोच्या ठिकाणी जाऊन बसावे. २ नंतर आलेल्या स्पर्धकांचा विचार केला जाणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी. परीक्षकांचा निर्णय अंतिम असेल.

हजारो रुपयांची ‘फ्री व्हाउचर’ 
वार्षिक सभासदत्व शुल्क अवघे रुपये ९९९. 
नोंदणीनंतर सभासदांना ‘तनिष्का’च्या १२ अंकांसहित १ हजार ४९९ रुपये किमतीच्या २३ पिसेसच्या मल्टिपर्पज सेटची भेट. 
(भेटवस्तूसाठी कृपया मोठी पिशवी आणावी.) 
नामवंत ब्रॅंड्‌सची हजारो रुपयांची फ्री गिफ्ट व्हाउचर व डिस्काउंट व्हाउचर भेट. 
ऑनलाइनसाठी प्ले स्टोअरवर ‘मधुरांगण’ टाइप करा, ॲप डाउनलोड करूनही सदस्यत्व नोंदणी शक्‍य. पासवर्ड ६ ते ७ डिजिटचा असावा. 
कुरिअरचा ऑप्शन निवडून सभासदत्व आणि कुरिअरची रक्कम ऑनलाइन भरल्यास गिफ्ट व इतर सर्व साहित्य घरपोच. 
ॲपवरून नोंदणी करणाऱ्या सभासदांना सर्व भेटवस्तू १५ दिवसांनंतर मिळतील, अन्यथा ‘सकाळ’च्या बुधवार पेठ किंवा पिंपरी कार्यालयात आधी संपर्क साधून (सकाळी ११ ते सायं. ६ या वेळेत) भेटवस्तू नेता येतील. 
ॲपव्यतिरिक्त नोंदणीसाठी - ‘सकाळ’ मुख्य कार्यालय, ५९५, बुधवार पेठ, पुणे किंवा ‘सकाळ’ पिंपरी कार्यालय, सनशाइन प्लाझा, हॉटेल रत्नाच्या मागे, पिंपरी (सकाळी ११ ते सायं. ६) 
अधिक माहितीसाठी संपर्क - ८३७८९९४०७६ किंवा ९०७५०१११४२

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com