अनधिकृत बांधकामे होणार वैध

अनधिकृत बांधकामे होणार वैध

पुणे - तुकडाबंदी कायद्याचे उल्लंघन करून केलेली बांधकामे आणि शेतजमिनीची विक्री दंड आकारून नियमित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र, ही बांधकामे नियमित करताना रेडी-रेकनरमधील संबंधित जमिनीच्या दरानुसार २५ टक्के रक्कम दंड म्हणून आकारण्यात येणार आहे. दंड न भरल्यास जमिनी जप्तीचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येणार आहेत.

सरकारच्या या निर्णयामुळे पुण्यासह राज्यातील प्रमुख शहरांच्या आजूबाजूला तुकडेबंदी कायद्याचे उल्लंघन करून झालेली बांधकामे नियमित होणार आहेत. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला असून, लवकरच अध्यादेश काढणार असल्याचे मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले.

किमान प्रमाणभूत क्षेत्रनिश्‍चिती
शेतजमिनीचे तुकडे पाडून विक्री करण्यास बंदी घालण्यासाठी सरकारने १९४७ मध्ये तुकडेबंदी आणि एकत्रीकरण कायदा लागू केला. त्याची नियमावली १९६५ मध्ये करण्यात आली. त्यात जमिनीच्या प्रकारानुसार शेतजमिनीचे किमान प्रमाणभूत क्षेत्र, त्यापेक्षा कमी क्षेत्राच्या शेतजमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करणे व शेतजमिनींचे एकत्रीकरण करणे यांची कार्यपद्धती निश्‍चित केली आहे. तसेच, दर दहा वर्षांनी शेतजमिनीचे किमान प्रमाणभूत क्षेत्र ठरविण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहे.

दंड न भरल्यास जमिनीचा लिलाव
संबंधितांना दंड भरणे शक्‍य नसल्यास लगतच्या जमीनधारकास २५ टक्‍क्‍यांऐवजी ५० टक्के दंडाची रक्कम सरकारदरबारी भरून ती जमीन खरेदी करण्याची संधी देण्यात येणार आहे. लगतच्या जमीनधारकाने देखील त्यास नकार दिल्यास ती जमीन जप्त करून तिचा लिलाव करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com