वरसगाव धरणातील लवासा दासवे तलाव भरला

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 जुलै 2017

धामण ओहोळ येथील तलाव दासवेपेक्षा कमी क्षमतेचा आहे. तो देखील या पूर्वीच भरून वाहू लागला आहे.

खडकवासला : वरसगाव धरणातील लवासा दासवे येथील तलाव पावसाने पूर्ण क्षमतेने भरल्याने त्यातून पाणी सोडण्यात आले आहे, अशी माहिती लवासा व खडकवासला पाटबंधारे विभागाने दिली आहे. 

दासवे तलाव परिसरात 1 जूनपासून आज अखेर 2000 मिलिमीटर पाऊस पडला आहे. यामुळे, ०.९२ (एक टीएमसी पेक्षा कमी) क्षमतेचा तलाव भरला आहे. तसेच लवासाचा धामण ओहोळ येथे देखील तलाव आहे. धामण ओहोळ येथील तलाव दासवेपेक्षा कमी क्षमतेचा आहे. तोदेखील या पूर्वीच भरून वाहू लागला आहे. अशी माहिती वरसगाव धरण क्षेत्रातील शाखा अभियंता टी डी पाटील व लावसाचा सुत्रांनी दिली. 

लवासा व धामण ओहोळ या दोन्ही धरणातील पाणी वरसगाव धरणात जमा होत आहे. दोन्ही धरणे भरल्यामुळे आता वरसगाव धरणातील पाणीसाठयात देखील वाढ होण्यास मदत होईल, अशी माहिती खडकवासला पाटबंधारे विभागाने दिली आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा :