पुण्यात भाजीपाल्याचा पुरवठा विस्कळित

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 जून 2017

पुणे - शेतकऱ्यांनी पुकारलेल्या बंदमुळे पुण्यातील भाजीपाल्याचा पुरवठा विस्कळित झाला आहे. पालेभाज्यांमध्ये मेथी, कोथिंबीरीचे भाव प्रति जुडी 40 रुपयांपर्यंत पोचले आहे. फळभाज्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे.

शनिवारी मार्केट यार्ड येथील घाऊक बाजार साप्ताहिक सुटीमुळे बंद असेल. त्यामुळे आवक होण्याची शक्‍यता नसल्याने भाजीपाल्याचा पुरवठा सुधारण्याची चिन्हे नाही. आठवडे बाजारही बंद आणि "ऑनलाइन' विक्रीवरही मर्यादा आली आहे. त्याचवेळी कडधान्य आणि अंडी खरेदीकडे ग्राहक वळेल, अशी अपेक्षा होती. परंतु, त्याची अद्याप मागणी नाही. मटण आणि चिकनचे प्रति किलोचे भाव जास्त आहेत. मासळीचे भावही सध्या तेजीत आहे. त्यामुळे हे भाजीपाल्याला तूर्तास पर्याय ठरू शकत नाहीत.