पुणे : मावळातील आठ गावांचे लवकरच पुनर्वसन

रामदास वाडेकर
सोमवार, 24 जुलै 2017

नाणे मावळातील भाजे, पाटण, ताजे, देवघर, वेहरगाव, शिलाटणे, जेवरेवाडी, कुसगाव येथील सिंहगड कॉलेज, ओळकाईवाडी व गुरववस्ती, हनुमान टेकडी, देवले, नेसावे, पाले, करंजगाव, तोरण, जांभवली या गावांचा तर आंदर मावळातील खांडी, कुसूर, कल्हाट, कशाळ, भोयरे, मोरमारेवाडी, वडेश्वर, फळणे, माऊ,साई, वाऊंड, कुसवली, किवळे, पारिठेवाडी या गावांचा समावेश होतो.

टाकवे बुद्रुक : जिओलॉजिकल सर्व्हे अॅण्ड इंडिया, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे व जी. एस. दि. ए. या संस्थांनी प्रत्यक्ष सर्वेक्षण केलेल्या मावळातील भुशी माऊ, बोरज, कळकराई, मालेवाडी, तुंग, लोहगड, ताजे या आठ लवकरच पुनर्वसन होईल. या गावांशिवाय इतर गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न कायम आहे.

पवन मावळातील लोहगड, धालेवाडी, मालेवाडी, तिकोणापेठ, खडकगेव्हंडे, आतवन, तुंग, मोरवे, कादव, शिळींब, चावसर, शिंदगाव, आंबेगाव, दुधिवरे, बेडसे, पाचाणे, ओहळे, दिवड, मळवंडी-ठुले या गावांचा समावेश होतो.

नाणे मावळातील भाजे, पाटण, ताजे, देवघर, वेहरगाव, शिलाटणे, जेवरेवाडी, कुसगाव येथील सिंहगड कॉलेज, ओळकाईवाडी व गुरववस्ती, हनुमान टेकडी, देवले, नेसावे, पाले, करंजगाव, तोरण, जांभवली या गावांचा तर आंदर मावळातील खांडी, कुसूर, कल्हाट, कशाळ, भोयरे, मोरमारेवाडी, वडेश्वर, फळणे, माऊ,साई, वाऊंड, कुसवली, किवळे, पारिठेवाडी या गावांचा समावेश होतो. 

ही गावे आज जीव धोक्यात घालून जगत  आहे.वरील आठ गावांचा प्रश्न आज ना उद्या सुटेलही लालफितीतून हा प्रश्न पुढे जाईल. पण इतर गावांचे काय?याही गावांवर ही टांगती तलवार उभी आहे.राज्य व केंद्र सरकारचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे, राज्यात आणि केंद्रात भाजप शिवसेनेचे सरकार सत्तेत आहे.खासदार शिवसेनेचे तर आमदार भाजपाचे आहे. दोन्ही पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी हा ज्वलंत प्रश्न सभागृहात मांडला तर मावळातील डोंगर द-या खो-यात राहणाऱ्याचा प्रश्न बहुतांशी मार्गी लागेल. 
भाजे येथे डोंगराची दरड कोसळून (दि.२३ जुलै १९८९) रोजी पहाटे गाव गाडले गेले यात ४९ लोकांना जीव गमवावा लागला.गत वर्षी  आंबेगाव तालुक्यातील माळीण गाव  (दि.३० जुलै २०१४) रोजी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास डोंगराच्या दरडी खाली गाडले गेले. त्यात सुमारे १५० नागरिकांचा बळी गेला. मावळ तालुक्यातील नायगाव येथे अनधिकृत डोंगराचे उत्खनन केलेल्या ठिकाणी भिंत बांधत असलेल्या दोन मजुराच्या अंगावर डोंगराचा कडा कोसळला. त्यात एक मजूर जागीच ठार तर एक जखमी झाला.या सारख्या अनपेक्षित घटनानी होत्याचे नव्हते होते.

मावळात झालेले अवैध उत्खनन, वेगवेगळ्या प्रकल्पासाठी झालेले संपादन ,बेसुमार झालेली  वृक्षतोड,धनिकांनी बांधकामासाठी केलेला निसर्गाचा -हास या ना अनेक कारणांनी नैसर्गिक प्रवाह बदलले आहे. विशेषत: सह्याद्रीच्या डोंगररांगेत वसलेल्या या गावात हे बदल दिसत आहेत.डोंगर अंगाशी,द-या खो-यातील या गावांचे पुनर्वसन मोठे धाडसाची बाब आहे, पण राज्या बोले दल हाले.तसे झाले तर लालफितीत या गावांचे पुनर्वसन आडकणार नाही.

ई सकाळवरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

पुणे

मंचर : वाळद (ता. खेड) येथे सायली निलेश शिंदे (वय ७) या मुलीला घरात खेळत असताना सोमवारी (ता.१८) संध्याकाळी पाच वाजता सर्पदंश झाला...

08.54 AM

खडकवासला : धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मंगळवारी दिवसभर धो धो पाऊस पडल्याने खडकवासला, पानशेत व वरसगाव हो तिन्ही धरणे 100 टक्के भरली...

08.48 AM

पुणे - बाजीराव रस्त्यावर पोलिस वाहतूक शाखेने "नो पार्किंग'चे फलक लावले आहेत. मात्र, जेथे फलक लावले तेथेच बेशिस्त चालक वाहने...

06.03 AM