पालकांपासून बचाव करण्यासाठी तावडेंभोवती 'सुरक्षा कडे'

सुशांत सांगवे
गुरुवार, 1 जून 2017

वेगवेगळ्या चौक्यातून पोलिसांना इथे सुरक्षेसाठी बोलावण्यात आल्याची माहिती काही पोलिसांनी 'सकाळ'ला दिली. त्यामुळे कधी नव्हे इतका फौजफाटा तावडे यांच्याभोवती आज दिसला.

पुणे - शुल्कवाढीच्या कारणामुळे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना पुण्यातील पालकांनी गेल्या काही दिवसात वारंवार घेराव घातला. 'मंत्री असून तुमचा उपयोग काय', असा सवालही उपस्थित केला होता. त्यामुळे पालकांनी आता जवळ येऊ नये म्हणून तावडे यांनी स्वतःभोवती पोलिसांचे 'सुरक्षा कडे' तैनात केले आहे.

गणेश कला क्रीडा रंगमच येथे तावडे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या एका सोहळ्यादरम्यान शंभरहुन अधिक पोलीस हजर होते. गणेश कला क्रीडा रंगमचाच्या चहुबाजूने पोलीसांचे घोळके उपस्थित होते.

वेगवेगळ्या चौक्यातून पोलिसांना इथे सुरक्षेसाठी बोलावण्यात आल्याची माहिती काही पोलिसांनी 'सकाळ'ला दिली. त्यामुळे कधी नव्हे इतका फौजफाटा तावडे यांच्याभोवती आज दिसला.

ई सकाळवरील आणखी ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :
एेतिहासिक शेतकरी संपाला महाराष्ट्रात सुरवात​
शेतकरी संपाला साहित्यिकांनी पाठिंबा द्यावा: रामदास फुटाणे
सोलापूरात फुले रस्त्यावर फेकून शेतकऱ्यांचा संपात सहभाग
सोपोरमध्ये चकमकीत दोन दहशतवादी ठार
'आयटी'तील तरुणीची गोळ्या घालून हत्या; प्रियकरानेच हत्या केल्याचा संशय​
प्रांजल पाटील देशातील 'पहिली' दृष्टिहीन विद्यार्थिनी जिल्हाधिकारी
जनावरे खरेदी-विक्रीच्या निर्णयात हस्तक्षेप नाही- केरळ उच्च न्यायालय​
मराठवाड्यात दीडशे दिवसांत 361 शेतकरी आत्महत्या​
अभिनेत्री सनी लिओनीच्या विमानाचा अपघात टळला