निवडणूका जवळ आल्या अन् विकास कामांना फुटले पाय

निवडणूका जवळ आल्या अन् विकास कामांना फुटले पाय
निवडणूका जवळ आल्या अन् विकास कामांना फुटले पाय

वाघोली (पुणे): निवडणूका जवळ आल्या अन् विकास कामांना जणू पाय फुटल्याचा भास वाघोलीतील नागरीकाना होऊ लागला आहे. खिशातील लाखो रुपये खर्चुन इच्छुकांनी विकास कामांचा सपाटा लावला आहे. यामुळे झोपडपट्टयातील रस्त्यांचेही काँक्रीटीकरण झाले आहे. रस्त्यांना दिव्यांची झळाली मिळाली आहे. याशिवाय महावितरणच्या विदयुत समस्येवरही तोडगा निघू लागला आहे. यामुळे निवडणुका दरवर्षी झाल्या पाहिजे. असे शब्द मतदारांच्या तोंडून निघाले नाही तर नवलच.

मतदाराना आकर्षित करण्यासाठी सत्ताधारी व विरोधी पॅनलमधील इच्छुकांनी वर्षभरापासूनच सुरुवात केली आहे. यासाठी स्पेशल रेल्वे व बसव्दारे यात्राही घडविण्यात आल्या. मात्र, मतदारांवर अधिक छाप पाडण्यासाठी खिशातील पैसे काढून विकास कामांचा सपाटा सुरु झाला. वर्षानुवर्ष न सुटलेला रस्त्याचा प्रश्न सोडवून त्याचे काँक्रीटीकरण झाले. पावसामुळे दुरवस्था झालेल्या अनेक रस्त्यांची दुरुस्ती झाली. झोपडपट्टी परीसरातील रस्त्यांचे काँक्रीटीकरण झाले. अनेक रस्त्याना दिव्यांची झळाळी मिळाली. बोअरवेल घेवून पाण्याच्या समस्यावर तोडगा काढण्यात आला. गटारे बंदीस्त करण्याचे काम झाले. उच्च दाबाची विदयुत वाहिनी बसविण्यासाठी स्वताःची जागाही देण्यात आली. नागरीकांच्या सोयीसाठी बसथांबे उभारले, असे अनेक विकास कामे स्वःखर्चातून करण्यात आली आहेत.

निवडणुका जवळ आल्याने ही विकासकामे केली आहेत, हे मतदाराना माहित असले तरी त्यांची सोय झाल्याने ते त्यांना मनापासून धन्यवाद देत आहेत. उद्या मत कोणाच्या पारडयात पडेल हे निकालानंतर समजणार असले तरी आज झालेल्या विकासकामांनी मतदार मात्र जाम खुष आहेत.

स्वःखर्चातून झालेली विकास कामे
1) रस्त्याची कामे - शांती पार्क, शिवतेज पार्क, ऑक्सी अल्टीमा रस्ता, काळूबाई नगर, बाजारतळ मैदानाजवळील वसाहत.
2) याठिकाणी दिवे बसले - अनुसया पार्क, दुबेनगर, शांती पार्क, मदरमेरी सोसायटी, आनंदनगर, संभाजी नगर, बाईफ रोड, सुयोग सेासायटी, नवीन भाडळे वस्ती, डोमखेल रोड, केसनंद रोड ते दुबेनगर, गणेश नगर.
3) पानमळा, केसनंद फाटा येथे बसशेड उभारण्यात आले.
4) बजरंग तरुण मंडळ येथे बोअरवेल घेवून मोटार बसविली.
5) सिध्दी पार्क सोसायटी, गणेश नगर, बजरंग तरुण मंडळ काळूबाई नगर येथे हॅलोजन दिवे खांब.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com