शिवनेरी किल्ल्यावरील वाहन तळाची भिंत कोसळली

दत्ता म्हसकर
मंगळवार, 4 जुलै 2017

सध्या पावसाळा सुरू असुन सुट्यांच्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक किल्ले शिवनेरीवर येत आहेत. शनिवार व रविवारी येणाऱ्या पर्यटकांची मोठी गर्दी असते. किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात.

जुन्नर - छत्रपती शिवरायांचे जन्मस्थान असलेल्या किल्ले शिवनेरीवरील वाहन तळावरील दगडी भिंत  व भराव सततच्या पावसामुळे ढासळला आहे. यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. गेले काही दिवस सुरु असलेल्या सततच्या पावसामुळे हा भराव वाहून गेला असल्याचे स्थानिकांनी सांगितले. सुमारे वीस ते पंचवीस वर्षापुर्वीचे हे काम असून देखभाल व दुरुस्ती साठी जिल्हा परीषदेकडे आहे. येथे तातडीने दुरुस्ती  करून वाहनांना होणारा धोका टाळावा अशी मागणी पर्यटक व शिवप्रेमींनी केली आहे. 

सध्या पावसाळा सुरू असुन सुट्यांच्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक किल्ले शिवनेरीवर येत आहेत. शनिवार व रविवारी येणाऱ्या पर्यटकांची मोठी गर्दी असते. किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. किल्ले शिवनेरीच्या पहील्या पायरीपासून जवळच  पर्यटकांच्या वाहनांसाठी वाहनतळ तयार करण्यात आला होता तर काही महिन्यांपूर्वीच या ठिकाणी सिमेंट रस्ता तयार करण्यात आला आहे.

मागील काही दिवसांपासून सतत सुरु असलेल्या पावसामुळे सोमवार दि ३ रोजी सांयकाळी सात च्या सुमारास या गाडीतळा जवळील भराव वाहून गेला आहे. तसेच येथील कठडा देखील वाहून गेल्यामुळे धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. यासोबतच वाहन तळावरील काही भागाला मोठ्या भेगा पडल्याने हा भराव देखील मुसळधार पाऊस झाल्याने खचून जाण्याची भिती व्यक्त केली जात आहे. यामुळे  सदरचा रस्ता  खचण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.  किल्ले शिवनेरीकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावरच ही दुरवस्था झाल्याने पर्यटकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. 

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा - 
जियोची ‘धन धना धन’ ऑफर संपतेय; आता पुढे काय?​
500-1000 च्या जुन्या नोटा भरण्यासाठी पुन्हा संधी द्या : सर्वोच्च न्यायालय​
हिंदी महासागर क्षेत्रात चिनी पाणबुडीचा वावर​
शेतकरी कर्जमुक्तीची जिल्हानिहाय आकडेवारी
गुप्त विठोबाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
पुलवामातील तिसऱ्या दहशतवाद्याचा खात्मा
मराठी तरुणांवर मध्य रेल्वेचा अन्याय; 432 युवक सेवेपासून वंचित​
विठूराया... शेतकरी कर्जमुक्त झाल्याशिवाय सुखी होणार नाही: मुख्यमंत्री फडणवीस​
GST च्या पारदर्शकतेचा लाभ सर्वांना!​
क्रिकेट : विंडीजचे फिल सिमन्सही भारताच्या प्रशिक्षकपदासाठी इच्छुक​
‘जीएसटी’बाबत सोशल मीडियावर अफवा​