पाल्यांबरोबर पालकांचीही केंद्रावर गर्दी

वारजे - ‘सकाळ चित्रकला स्पर्धा २०१७’ मध्ये स्मिता पाटील शाळेत चित्रे रेखाटताना बालचमू.
वारजे - ‘सकाळ चित्रकला स्पर्धा २०१७’ मध्ये स्मिता पाटील शाळेत चित्रे रेखाटताना बालचमू.

वारजे - येथील स्मिता पाटील शाळेत ‘सकाळ’च्या चित्रकला स्पर्धेला भरघोस प्रतिसाद मिळाला. बालचमूंनी सकाळी आठ वाजल्यापासून शाळेत गर्दी केली होती. त्यांच्यासोबत त्यांचे पालकही उपस्थित होते. काही पालकांनी तर शाळेचा पत्ता शोधता यावा म्हणून स्पर्धेच्या एक तास अगोदर घर सोडले होते.

मुलांबरोबर त्यांचे पालकही मोठ्या उत्साहात आपल्या पाल्यासाठी स्पर्धा केंद्रावर आले होते. आनंदी वातावरणात येथील शाळेत वारजेतील असंख्य विद्यार्थी सहभागी झाले होते. 

शाळेचे मुख्याध्यापक संतोष तनपुरे जातीने लक्ष ठेवून होते. शिक्षक संतोष कांबळे, अजिनाथ वायसे, जयश्री पांचाळ, योगेश पवार यांनी विशेष परिश्रम घेऊन स्पर्धा पार पाडली.

विद्यार्थांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी, तसेच त्यांचे व्यक्तिमत्त्व सिद्ध करण्यासाठी ‘सकाळ’च्या माध्यमातून अतिशय चांगल्या स्पर्धेचे आयोजन होत आहे. ‘सकाळ’चे कार्य हे देशभक्तीचे आहे. या कार्याला माझा सलाम.
- संतोष तनपुरे, मुख्याध्यापक

मी आज या स्पर्धेचे सुपरव्हिजन करत आहे; मात्र १९९३ मध्ये दौंड येथील केंद्रावर ‘सकाळ’च्या चित्रकला स्पर्धेत सहभागी होऊन मी उत्तेजनार्थ बक्षीसही मिळविले आहे. तेव्हापासून या स्पर्धेची मला माहिती आहे.
- संतोष कांबळे, शिक्षक

सकाळ’चा चित्रकला स्पर्धा हा उपक्रम बालमनाला विकसित करणारा उपक्रम आहे. त्यामधून लहान मुलांच्या कलागुणांना वाव मिळणार आहे. त्यातून एखादा कलाकारही घडू शकतो. त्यामुळे ‘सकाळ’च्या उपक्रमात आमचा सहभाग असणार आहे.
- अजिनाथ वायसे, शिक्षक

चित्रकला हा विषय मुलांचा आवडता विषय आहे. इतर विषयांपासून थोडासा आनंद मिळावा, तोच हा प्रकार आहे. आनंदाचा विषय म्हणून विद्यार्थी याकडे पाहतात. त्यांच्या मनातील प्रसंगाला ते चित्राद्वारे जागे करतात. ‘सकाळ’ने अशा विषयावर स्पर्धा घेणे समाजसेवेचेच व्रत आहे.
- जयश्री पांचाळ, शिक्षिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com