पुणेकरांना पुरेसे पाणी मिळणार 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 सप्टेंबर 2017

पुणे - ""समाधानकारक पाऊस झाल्याने शहराच्या पाणीपुरवठ्यात कपात होणार नाही. त्यामुळे पुणेकरांना पुरेसे पाणी मिळेल,'' असे राज्याचे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी शुक्रवारी सांगितले. टेमघर धरणाची दुरुस्ती पुढील पावसाळ्यापूर्वी होईल. या कामाकडे लक्ष दिले आहे, असेही ते म्हणाले. 

शहरात यंदा चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा आहे. मात्र, पुणेकरांना जपून पाणी वापरण्याचा सल्ला पाटबंधारे खात्याने महापालिकेला दिला आहे. त्यामुळे पाणीकपातीची शक्‍यता वर्तविण्यात येत होती. या पार्श्‍वभूमीवर शिवतारे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. महापालिका आयुक्त कुणाल कुमार या वेळी उपस्थित होते. 

दरम्यान, हद्दीलगतची गावे वर्षभरात महापालिकेत घेण्याचे शपथपत्र सरकारने सादर केल्याने गावांच्या पाण्याचे नियोजन करावे, अशी सूचना शिवतारे यांनी महापालिका प्रशासनाला शुक्रवारी केली. 

विमानतळामुळे सर्वांचा विकास 
पुरंदर येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाला आता विरोध नाही. त्यामुळे विमानतळ पुरंदरलाच होणार आहे, असे शिवतारे यांनी स्पष्ट केले. विमानतळामुळे पुरंदर तालुक्‍याचाच नव्हे तर जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळणार आहे. नागरी सेवेसाठी स्वतंत्र विमानतळ आवश्‍यक असून, पुरंदरमधील छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हे पुण्याचे असेल. जमीन मालकांना योग्य नुकसानभरपाई मिळेल, कोणाचेही नुकसान होऊ देणार नाही, असेही ते म्हणाले.