समान पाणी योजनेबाबत "सीबीआय'कडे तक्रार 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 जुलै 2017

पुणे - समान पाणीपुरवठा योजनेच्या निविदांत भ्रष्टाचार झाला असून, त्याची तक्रार संजय कानडे नामक व्यक्तीने केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) केली आहे. याबाबत आयुक्तांनी कार्यवाही करावी, असे "सीबीआय'ने एका पत्राद्वारे महापालिकेला नुकतेच कळविले आहे. दरम्यान, "महापालिकेच्या प्रकल्पांबाबत अशा तक्रारी होतच असतात. निविदा अजून मंजूरही केलेल्या नाहीत. त्यामुळे भ्रष्टाचाराचा प्रश्‍नच उद्‌भवत नाही. त्यात तथ्य असते तर सीबीआयने कारवाई केली असती', असे प्रशासनाने म्हटले आहे. 

पाणी योजनेच्या जलवाहिन्यांच्या निविदांमध्ये संगनमत झाल्याचे तक्रार अर्जात म्हटले आहे. पारदर्शक कारभाराचे आश्‍वासन देणाऱ्या आयुक्तांनी "सीबीआय'च्या पत्राची दखल घेऊन निविदा प्रक्रिया रद्द करावी, अशी मागणी कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी केली आहे. तसेच हे पत्र सदस्यांपासून प्रशासनाने दडवून ठेवल्याचाही आरोप त्यांनी केला. दरम्यान, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनीही पाणीपुरवठ्याच्या निविदांमध्ये भ्रष्टाचार झाला असून, या बाबत सखोल चौकशी करावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.