विस्कळित पाणीपुरवठा; नगरसेवक आक्रमक 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 जुलै 2017

पुणे - सोलापूर रस्त्यावर काही ठिकाणी पाणीपुरवठा विस्कळित झाल्यामुळे हडपसर, वानवडी आणि कोंढव्यातील नगरसेवक महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शुक्रवारी आक्रमक झाले. दरम्यान 30 हजार लिटर क्षमतेच्या नवीन टाकीचे बांधकाम दोन महिन्यांत पूर्ण झाल्यावर पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले. 

पुणे - सोलापूर रस्त्यावर काही ठिकाणी पाणीपुरवठा विस्कळित झाल्यामुळे हडपसर, वानवडी आणि कोंढव्यातील नगरसेवक महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शुक्रवारी आक्रमक झाले. दरम्यान 30 हजार लिटर क्षमतेच्या नवीन टाकीचे बांधकाम दोन महिन्यांत पूर्ण झाल्यावर पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले. 

हडपसर, वानवडी आणि कोंढव्यातील पाणीपुरवठा विस्कळित झाल्याचा मुद्दा सर्वसाधारण सभेचे कामकाज सुरू झाल्यावर वैशाली बनकर यांनी उपस्थित केला. विरोधी पक्षनेते चेतन तुपे, तसेच नंदा लोणकर, परवीन फिरोज, हाजी गफूर पठाण, अशोक कांबळे, योगेश ससाणे यांनीही याबाबत विविध मुद्दे उपस्थित केले. या परिसरात पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होत नसल्याचे बनकर यांनी म्हटले, तर वानवडीतील 15 सोसायट्यांत गेल्या महिन्यापासून विस्कळित पाणीपुरवठ्यामुळे रहिवाशी संतप्त झाले असून, ते आता आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याचे लोणकर यांनी सांगितले. कोंढव्यातही सातत्याने पाणीपुरवठा विस्कळित होत असल्याचे पठाण आणि परवीन यांनी सांगितले. सोसायट्यांत पाण्याचे दुर्भिक्ष्य, तर झोपडपट्ट्यांत मुबलक पाणी असून, तेथील नळजोडांना तोट्याही नसल्याचे ससाणे यांनी सांगितले. आंबेगाव पठार, धनकवडी परिसरातही पाण्याच्या अनेक समस्या असल्याचे अश्‍विनी भागवत यांनी नमूद केले. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयात आणि जलशुद्धीकरण केंद्रातही पाणी आहे. मात्र, वितरणातील त्रुटींमुळे या भागात पावसाळ्यात पाणीटंचाई झाली आहे, असे तुपे यांनी नमूद केले. महापौर मुक्ता टिळक यांनी याबाबत खुलासा करण्याचा आदेश प्रशासनाला दिला. त्या वेळी पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी म्हणाले, ""रामटेकडी भागात 60 हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी आहे. परंतु, तिची क्षमता कमी पडत असल्यामुळे नवीन 30 हजार लिटर क्षमतेची टाकी बांधण्यात येत आहे. ते काम दोन महिन्यांत पूर्ण होईल. त्यानंतर या भागाचा पाणीपुरवठा सुरळीत होईल. वानवडीतील बिघाड दुरुस्त करण्याचे काम सुरू असून, दोन दिवसांत तेथील पाणीपुरवठा सुरळीत होईल.'' 

वितरणातील दोष कारणीभूत 
शहराची वाटचाल स्मार्ट सिटीकडे सुरू असताना, शहराच्या विविध भागांत केवळ वितरणातील दोषांमुळे पाणी पुरवठा विस्कळित झाला आहे. त्याला प्रशासन जबाबदार असून, सत्ताधाऱ्यांनी किमान प्रशासनाला तरी आदेश द्यावेत, अशी मागणी बाबूराव चांदेरे यांनी महापौरांकडे केली. 24 तास पाणीपुरवठ्याबाबत प्रभागनिहाय जलवाहिन्यांचे आराखडे पुढील महिन्यात सभासदांना देण्यात येतील, असे व्ही. जी. कुलकर्णी यांनी सांगितले. 

पुणे

नवी सांगवी : पिंपळे गुरव मध्ये गोळीबार झाल्याची खोटी अफवा पसरविणाऱ्यास सांगवी पोलिसांनी अटक केली आहे. प्रसाद उर्फ लल्या...

11.18 AM

नवी सांगवी : "ऐन पावसाळ्यात पिंपळे गुरव परिसरातील कचरा कुंड्या ओसंडून वाहत असून त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण...

11.06 AM

पुणे -  ""सोपं असेल तर ते आयुष्य कसलं...? अडचणी, आव्हानं ही तर हवीतच ! गुळगुळीत रस्ते फार उपयोगाचे नाहीत. रस्त्यात...

05.03 AM