राज्यातील काही भागांत जोरदार पावसाचा अंदाज 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 ऑक्टोबर 2017

पुणे - राजस्थानवरून परतीच्या मार्गावर असलेला मॉन्सून येत्या दोन ते तीन दिवसांत राज्यात दाखल होण्याची शक्‍यता आहे. बहुतांश भागात सध्या ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडत आहे. तसेच सोमवारी (ता. 9) संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

राज्याच्या बहुतांश भागात सकाळी उन्हाचा चटका होता. त्यामुळे कमाल तापमानाचा पारा सरासरी इतका वाढला. दुपारनंतर ढगाळ वातावरण आणि संध्याकाळी ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या सरी पडल्या. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांत हे वातावरण होते. 

राज्यातील बहुतांशी भागात हवेचा दाब कमी झाला असून, आर्द्रता वाढली आहे. त्यामुळे बुधवारपर्यंत (ता. 11) कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्‍यता आहे. गुरुवारपर्यंत (ता. 12) कोकण, गोव्यासह मध्य महाराष्ट्रात बहुतांशी ठिकाणी, तर मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. पुणे परिसरातही शनिवारपर्यंत काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्‍यता आहे. परतीच्या पावसामुळे उत्तरेकडून दक्षिणेकडे वारे वाहत आहेत, तर सूर्यकिरणे तिरपी पडत आहेत. त्यामुळे दक्षिण भारतात कमाल तापमानात वाढ होत असल्याचे हवामान विभागाच्या वतीने सांगण्यात आले.