थंड वाऱ्याच्या प्रभावामुळे किमान तापमानात घट 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 जानेवारी 2018

पुणे - उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा प्रभाव वाढत असल्यामुळे किमान तापमानात लक्षणीय घट झाली आहे. मध्य महाराष्ट्रासह विदर्भात थंडीची लाट निर्माण झाली आहे. राज्यात नाशिकमध्ये 7.2 अंश सेल्सिअस असे सर्वांत कमी किमान तापमान नोंदविले गेले; तर पुण्यातही किमान तापमान 9.9 अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले. 

थंड वाऱ्याच्या प्रभावामुळे राज्यात अनेक भागात किमान तापमानात घट झाल्याचे दिसून आले. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात लक्षणीय घट झाली आहे. कोकण, गोव्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते. जळगाव, महाबळेश्वर, नाशिक, मालेगाव, सातारा, सोलापूर येथील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत दोन ते तीन अंश सेल्सिअसने घट झाली आहे. कोकणात मुंबई, रत्नागिरी, भीरा, डहाणू येथील किमान तापमान सरासरीच्या तुलनेत दोन अंशाने घटले. मराठवाड्यातही थंडीत किंचित वाढ झाली आहे. विदर्भातील अनेक भागांत थंडीचा कडाका जाणवू लागला आहे. पुणे आणि परिसरात येत्या दोन दिवसांत आकाश निरभ्र राहण्याची शक्‍यता असून, किमान तापमान 10 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.

Web Title: pune news winter temperature