विळीने गळा चिरून महिलेची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 ऑगस्ट 2017

पुणे - गणेश पेठेत एका विवाहितेने विळीने गळा चिरून आत्महत्या केल्याचा प्रकार सोमवारी सकाळी उघड झाला. या महिलेने प्रथम गळफास घेऊन आत्महत्या करणाऱ्याचा प्रयत्न केल्याची प्राथमिक माहिती तपासात पुढे आली आहे.

सोमा बोप्पादत्ता जाना (वय 24, मूळ रा. पश्‍चिम बंगाल) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. ती पतीसह गणेश पेठेतील भामा सोसायटीत भाडेतत्त्वावर राहत होती. तिचे पती सराफाकडे कारागीर म्हणून काम करतात.

रविवारी मध्यरात्री सोमा या घरी एकट्या होत्या. त्या वेळी त्यांनी प्रथम पंख्याला गळफास लावून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांनी विळीने गळा चिरून आत्महत्या केली. रात्री पती घरी आल्यानंतर त्याला पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. या प्रकाराची माहिती नागरिकांनी पोलिस नियंत्रण कक्षाला कळविल्यानंतर फरासखाना पोलिस घटनास्थळी पोचले. काही महिन्यापूर्वी सोमा यांचा गर्भपात झाला होता. त्या पुन्हा गर्भवती होत्या, पुन्हा गर्भपात करावा लागेल, या भीतीने त्यांनी आत्महत्या केल्याची शक्‍यता पोलिसांनी वर्तविली आहे.