कचरा प्रकल्पाला येवलेवाडी ग्रामसभेत विरोध

कचरा प्रकल्पाला येवलेवाडी ग्रामसभेत विरोध

कोंढवा : येवलेवाडी गावच्या विकास आराखड्यातील कचरा प्रक्रिया प्रकल्पाला गावाचा विरोध असून ग्रामस्थांची प्राथमिक बैठक भैरवनाथ मंदिरात झाली. यामध्ये येवलेवाडी कचरा विरोधी कृती समितीची स्थापना करण्यात आली. सातशेहून अधिक ग्रामस्थांनी कचरा प्रकल्पाला विरोध असल्याच्या हरकती यावेळी समितीकडे दिल्या आहेत.

येवलेवाडी गावचा २०१२ मध्ये महापालिकेत समावेश करण्यात आला. गावचे क्षेत्रफळ ६८१. ७७ हेक्टर असून त्यापैकी २. ३ क्षेत्र डोंगरमाथा डोंगर उतारावर,वनविभाग तलाव नाले आहेत. १. ३ क्षेत्रफळ रहिवाशी असून विकास आराखड्यात ४२ आरक्षणे आहेत. महानगर पालिकेच्या मुख्य़ सभेत विकास आराखडयास मान्यता देण्यात आली. त्यावर नागरिकांच्या हरकती व सुचना मागवण्यात आल्या आहेत.

सर्व्हे क्रमांक ३० व ३१ हि गावाच्या पाठीमागील पश्चिम बाजूस डोंगर उतार,डोंगरमाथा आरक्षित दर्शविण्यात आली आहे. हि जागा डोंगरावर उंच भागात असल्याने येथे कचरा प्रकल्प झाल्यास पश्चिमेकडून येणारया हवेतून गावात प्रदूषण होईल. परिसरातच मोठी महाविद्यालय असून गावातील नागरीक व विद्यार्थ्यी यांच्या  आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक व घातक असल्याने गावातील नागिरकांची यासाठी हारकत असून नुकतीच याबाबत गावातील भैरवनाथ मंदिरात ग्रामसभा घेण्यात आली. त्यामध्ये मोठ्यासंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. येवलेवाडी कचरा प्रकल्प कृती विरोधी समितीची यासभेत स्थापना करण्यात आली आहे. येत्या दोन दिवसात समिती व ग्रामस्थ आमदार योगेश टिळेकर व जलसंपदा मंत्री विजय शिवतारे यांची भेट घेणार आहे. त्यानंतर गावातील नागरिक मोठया संख्येने महापालिकेत हरकत नोंदविण्यास जाणार असल्याचे ग्रामसभेत ठरविण्यात आले आहे.  

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com