जमविलेल्या कपड्यांतून मिळाली आदिवासींना ऊब

जमविलेल्या कपड्यांतून मिळाली आदिवासींना ऊब
जमविलेल्या कपड्यांतून मिळाली आदिवासींना ऊब

पुणे: आदिवासी, कातकरी लोकांना किमान आवश्‍यक कपडे मिळवून देण्यासाठी यंग ट्रेकर्स संस्थेच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला. संस्थेतर्फे सुनील भोकरे यांनी वेताळ टेकडीवर "माणुसकीची उबदार भिंत' अशी पाटी लावत पुणेकरांना जुने कपडे देण्याचे आवाहन केले अन्‌ कपड्यांचा ढीग जमा झाला.

राज्यातील डोंगरदऱ्या, गड-किल्ल्यांवर भ्रमंती करत असताना आदिवासींकडे पुरेसे कपडे नाहीत, असे भोकरे यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी हा उपक्रम राबविला. त्यातून जमवलेले कपडे राजगड पायथ्याजवळील मार्गासनी येथील झोपडपट्टी, आदिवासी व कातकरी लोकांना वाटून भोकरे यांनी या समाजाशी नवे नाते जोडले.

या उपक्रमासंबंधी माहिती देताना सुरेश साळवे म्हणाले, ""आम्ही जमवलेल्या कपड्यांमध्ये साड्या, लहान मुलांचे कपडे, चादरी, बेडशीट, शर्ट-पॅंटचा समावेश आहे. त्याची वर्गवारी करून ते दवाखाने, आदिवासी पाडे, झोपडपट्टी, कातकरी आणि फुटपाथवरील लोकांना दिले जातात. आतापर्यंत संस्थेने पोकरेवाडी, कल्याणगड, जांभूळवाडी, लोहगडवाडी, मार्गासनी या दुर्गम ठिकाणी जाऊन कपड्यांचे वाटप केले आहे.'' शिवाजी कोकाटे, विशाल कोल्हे, रफिक शेख, दत्ता अवगते, पायल भोकरे, यश भोकरे यांनी उपक्रमासाठी सहकार्य केले आहे.

वेताळ टेकडीवर फिरायला येणारे लोक माणुसकीच्या उबदार भिंतीजवळ जुने कपडे आणून ठेवतात. आम्ही हे कपडे घेऊन खासकरून गड-किल्ल्यांच्या पायथ्याशेजारील दुर्गम गावांमध्ये जातो. तेव्हा कपडे घेण्यासाठी गर्दी होते. लहान मुलांनी कपडे घातल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद समाधान देणारा असतो. यापुढे आम्ही फुटपाथवरील लोकांना बेडशीट, चादर वाटप करणार आहोत.''
- सुनील भोकरे, अध्यक्ष, यंग ट्रेकर्स संस्था

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com