कॅफे - मित्र...म्युझिक...बुक अन्‌ बरंच काही!

कॅफे - मित्र...म्युझिक...बुक अन्‌ बरंच काही!

पुणे - तरुणाईसाठी मित्रांसोबत गप्पा मारण्याचे आवडते ठिकाण म्हणजे कॉफी शॉप अन्‌ कॅफे. एखाद्या कॅफेमध्ये स्पेशल डिशसोबत आपल्या आवडत्या मित्र-मैत्रिणींसोबत तासन्‌तास बसायला कोणाला आवडत नाही. यासोबतच जर आपल्या आवडीचं गाणं, कधी पुस्तक, तर कधी चक्क पाळीव प्राणी असेल, तर मजा काही औरच. अशाच विविध ‘थीम’वर आधारित कॅफेचं प्रमाण शहर परिसरात वाढतेय आणि त्याला तरुणाई पसंतीही देत आहे.

‘आर्ट कॅफे’, ‘बुक कॅफे’, ‘म्युझिक कॅफे’, ‘बाइकर्स कॅफे’, ‘पेट कॅफे’ अशा विविध ‘थीम’वर आधारित कॅफेमुळे तरुणाईला एन्जॉयमेंटसाठी एक वेगळाच अड्डा मिळाला आहे. मूळच्या आयटी, इव्हेंट मॅनेजमेंट, डॉक्‍टर यांसारख्या क्षेत्रातील मंडळींनी हे कॅफे सुरू केले आहेत. 

थीम कॅफेचे स्वरूप : 
बुक कॅफे :  प्रेमकथा, रहस्यकथा, ऐतिहासिककथा, नवोदित, नामवंत लेखक, अभिनेते आणि अभिनेत्रींनी लिहिलेली पुस्तके अशा विविध पुस्तकांनी खचाखच भरलेली कपाटं, बसायला इंडो-वेस्टर्न आसन पद्धती आणि सोबतीला खाद्यपदार्थांची रेलचेल. 

म्युझिक कॅफे : सुमधुर संगीत आणि हातात कॉफीचा मग. संगीतप्रेमींसाठी हे कॅफे म्हणजे पर्वणीच ठरते. जॅझ, रॉकपासून ते अगदी शास्त्रीय संगीतापर्यंत आणि प्रचलित संगीतकारापासून ते एखाद्या नवोदित बॅण्डपर्यंत कोणत्याही प्रकारचे संगीत या ठिकाणी ऐकायला मिळते. येणारा तणाव हलका करण्यासाठी ही ‘म्युझिकल थेरेपी’ तरुणाईची आवडीची बनली आहे. 

आर्ट कॅफे : निरनिराळ्या प्रकारची प्रदर्शने, सांस्कृतिक कार्यक्रम आणि कार्यशाळा त्याला साजेसे इंटेरिअर हेच या कॅफेचं वैशिष्ट्य ठरते. कलागुणांना वाव मिळण्यासाठी हे एक अनोखं 
व्यासपीठ आहे.

पेट कॅफे : पाळीव प्राण्यांना घेऊन नागरिक या ठिकाणी गप्पांची मैफल जमवतात. कोणाकडे कोणता नवीन, वेगळा प्राणी आहे, प्राण्यांसाठीचे फॅशन शो कोणते, तसेच कोणता ‘पेटफूड’ चांगला, कोणता डॉक्‍टर चांगला अशा विषयांवरील गप्पा या कॅफेमध्ये रंगतात. इतकेच नव्हे तर प्राण्यांनाही वेगवेगळे प्राणी भेटतात. त्यामुळे तेही 
एंजॉय करतात.

बाईकर्स ‘कॅफे’ : ‘या बाईकने ‘वीकेंड’ला लोणावळ्याला जायचा प्लॅन आहे. इच्छुकांनी संपर्क साधावा’ इथपासून ते अमूक  एक ग्रुप पुणे ते मनाली, शिमला अशा बाईक टूर आयोजित करत आहेत, तुम्हाला सहभागी व्हायचे का? असा विविध कार्यक्रमांची आखणी सोबतच बाईकवेड्या तरुणाईच्या गप्पा...बाईक्‍सच्या विविध पार्टसारखी दिसणारे  इंटेरिअर असेच काहीसे या कॅफेचं स्वरूप असते. 

 बुक कॅफे नुकतेच सुरू केले असून तरुणांचा प्रतिसाद उत्तम आहे. बुक कॅफे सुरू केले होते, तेव्हा वाटले की आजची तरुण पिढी पुस्तक वाचेल का, मात्र तरुणांचा वाढता प्रतिसाद बघता त्यांना पुस्तके वाचनाची आवड आहे. हे दिसून आले.
- सती भावे-हॉल, बुक कॅफेचालक 

 ज्या तरुणांना गाण्याची आवड आहे, असे तरुण कॅफेत येतात; मात्र इतरही तरुण येत असतात. बरेच जण कामाचा ताण हलका व्हावा, मनाला शांती मिळावी, यासाठी खास म्युझिक थेरपीसाठी येतात. कॅफेमध्ये येण्याचे प्रमाण १८ ते ३० वयोगटातील यंगस्टर्सचे जास्त असते.
- संतोष घाटपांडे, म्युझिकल कॅफे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com