नीरा-भीमा नदीजोड अपघात:'संचालकावर गुन्हे दाखल करा'

bharane
bharane

वालचंदनगर - इंदापूर तालुक्यातील अकोले येथे नीरा-भीमा नदीजोड प्रकल्पाचे काम सुरु असताना बोगद्यामध्ये झालेल्या अपघातप्रकरणी काम करणाऱ्या कंपनीच्या संचालकावर गुन्हे दाखल करण्याची मागणी इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रेय भरणे यांनी केली आहे.

सोमवार(ता.२०) रोजी अकोले येथे सायंकाळी सव्वापाच  वाजण्याच्या सुमारास आठ कामगारांना  बोगद्यामधून बाहेर काढत असतापा क्रेनचा वायर रोप तुटून  झालेल्या अपघातामध्ये आठ कामगारांचा  जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी ३१ तासानंतर क्रेन अाॅपरेटर सहित इतर चार कर्मचाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकल्पामध्ये काम करणाऱ्या कामगारांना सुरक्षेची साधने पुरवणे,चांगल्या दर्जाच्या मशनरीचा वापर करणे ही सर्व जबाबदारी काम करणाऱ्या कंपनीच्या संचालकाची आहे. कंपनीच्या कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याऐवजी कंपनीच्या संचालकावर गुन्हा दाखल करण्याची गरज असल्याची मागणी आमदार भरणे यांनी केली आहे.

तसेच भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाचे सचिन आरडे, गजानन वाकसे, माउली वाघमोडे,गणेश सुळ यांना ही कंपनीचे मालकावर गुन्हे दाखल करुन अपघातामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या नातेवाईकांना दहा लाख रुपये देण्याची मागणी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com