पोलिसांची मेगासिटी

Pune-Police
Pune-Police

घोषणा 2010 मध्ये... काम सुुुरू 2017 मध्ये...

एका ठिकाणी झालेल्या गैरव्यवहाराचा राज्यात फटका कसा बसू शकतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे पोलिसांच्या घरांसाठीचा ‘मेगासिटी’ प्रकल्प! मुंबईतील ‘आदर्श’ गैरव्यवहारामुळे पोलिसांच्या या गृहप्रकल्पाकडे तब्बल साडेपाच वर्षे दुर्लक्ष झाले. साडेपाच हजार पोलिसांच्या हक्काच्या घरांसाठी दीर्घ काळ प्रलंबित असलेला हा प्रकल्प काही महिन्यांपूर्वी लोहगावमध्ये सुरू झाला. 

राज्याच्या कानाकोपऱ्यात काम करणारे पोलिसांना मुलांचे शिक्षण, रोजगारासाठी पुण्यात वास्तव्य करणे शक्‍य व्हावे, यासाठी ‘महाराष्ट्र पोलिस मेगासिटी सहकारी गृहरचना’ या संस्थेची स्थापना झाली. त्याद्वारे साडेपाच हजार पोलिसांना घरे देण्याच्या प्रकल्पाची घोषणा २०१० मध्ये झाली. झोन बदलासाठी ‘मेगासिटी’ची फाइल मंत्रालयात गेली, त्याच सुमारास आदर्श सोसायटी गैरव्यवहार उघडकीस आला. त्यापुढच्या साडेपाच वर्षांमध्ये या फाइलवर कोणताही निर्णय झाला नाही. परिणामी बांधकाम खर्च वाढत गेला. सहा महिन्यांपूर्वी पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाकडून या प्रकल्पाला बांधकामाची परवानगी मिळाली. त्यानंतर या प्रकल्पाचे काम लगेच सुरू झाले. ‘मेगासिटी’च्या धर्तीवर औरंगाबाद, लातूर आणि नांदेड येथेही पोलिसांसाठी गृहप्रकल्प राबविण्यात येत आहेत.

पोलिसांच्या हक्काच्या घरांसाठी हा राज्यातील महत्त्वाचा प्रकल्प आहे. पण ‘आदर्श’ गैरव्यवहारामुळे साडेपाच वर्षे या प्रकल्पाकडे दुर्लक्ष झाले. सध्या इमारतींच्या पायाभरणीचे काम सुरू आहे. बांधकामासाठी ‘प्रिकार्ट’ तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. त्यात ’रेडीमेड’ भिंतींचा वापर होतो. यात इमारतींच्या पायाभरणीसाठी अधिक वेळ लागतो; पण त्यानंतर रेडीमेड भिंतींद्वारे इमारत उभी राहण्याचे काम वेगाने होते.
- मोहम्मद रफी खान, प्रकल्प प्रमुख व सेवा निवृत्त पोलिस निरीक्षक

असा आहे प्रकल्प!
५,५०० पोलिस सभासदांची संख्या (पुणे व ग्रामीण पोलिस - २०००)
११६ एकर गृहप्रकल्पाची जागा
६० इमारतींची संख्या
१२ पायाभरणी झालेल्या इमारती
१४ मजली इमारतींची उंची
५,२८४ घरांची संख्या
१६० दुकानांची संख्या
लोहगाव ठिकाण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com