...आणि पोलिसांनी वाचविला आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्याचा जीव!

...आणि पोलिसांनी वाचविला आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्याचा जीव!

पुणे : रविवारी रात्री अकरा वाजताची वेळ. पोलिस नियंत्रण कक्षातुन हडपसर पोलिस ठाण्याच्या बीट मार्शल पोलिस विठ्ठल चिपाडे व युवराज कांबळे यांना एका व्यक्तीने गळफास घेतल्याबाबत फोन येतो. त्यानंतर पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल होता. पत्नीबरोबर झालेल्या भांडणामुळे एका व्यक्तीने काही मिनिटांपूर्वीच गळफास घेतल्याचे दिसले. बघ्यांची गर्दी गळफास घेताना मोबाईलवर शुटींग करण्यात व्यस्त होती. पोलिसांनी मात्र तत्काळ दरवाजा उघडून व्यक्तीला खाली उतरविले आणि 108 रुग्णवाहिकेतून रुग्णालयात पोचविले. उपचारानंतर हळूहळू ती व्यक्ती शुद्धीवर आली. पोलिसांच्या प्रयत्नामुळे एका व्यक्तीचे प्राण वाचविण्यास मदत झाली. 

पोलिसांच्या कार्यपद्धती व कार्यक्षमतेवर कायमच प्रश्‍नचिन्ह उभे केले जाते. परंतु रविवारी पोलिसांनी केलेल्या कामगिरीने या टिकेला चोख उत्तर दिले. हडपसर पोलिस ठाण्याचे बीट मार्शल विठ्ठल चिपाडे व युवराज कांबळे हे रविवारी रात्रगस्त करत होते.

त्यावेळी पोलिस नियंत्रण कक्षातुन वॉकीटॉकीद्वारे कौटुंबिक भांडणातून एका व्यक्तीने गळफास घेतल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानंतर दोघेही काही मिनीटातच घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी सुब्बु नायर (वय 32, रा. भगवती हाऊसेस, हडपसर) यांनी गळफास घेतली होती. 

चिपाडे व कांबळे यांनी तत्काळ आतून बंद असलेला दरवाजा जोरदार धक्के मारुन उघडला. त्यावेळी समोर नायर यांनी गळफास घेतली होती. दोघांनी नायर यांना यांच्या गळ्यातील फास चाकूने कापला. त्याचवेळी 108 रुग्णवाहिकेस फोन करुन बोलावून घेतले.

रुग्णवाहिका वेळेत पोचल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयामध्ये दाखल केल्यावर डॉक्‍टरांनी त्यांच्यावर उपचार केले. थोड्या वेळाने नायर शुद्धीवर आले.त्यामुळे त्यांचे कुटुंबीयही सुखावले. दरम्यान ही बातमी चिपाडे व कांबळे यांना मिळाली. त्यावेळी आपल्यामुळे आत्महत्या करु पाहणाऱ्या एकाचे प्राण वाचले, याचा आनंद चिपाडे व कांबळे यांनाही झाला. 

"आम्हाला माहिती मिळताच घटनास्थळी गेलो, त्यावेळी बघ्यांच्या गर्दीमधील काहीजण फोटो काढण्यात, तर काही मोबाईलवर शुटींग करण्यात व्यस्त असल्याचे दिसले. परंतु गळफास घेणाऱ्या व्यक्तीचा जीव वाचविण्यासाठी कोणीच पुढे येत नव्हते. गळफास घेऊन काही मिनीटेच झाली होती. त्यामुळे आम्ही त्यांना खाली उतरवुन लगेच दवाखान्यात हलविले.''
- विठ्ठल चिपाडे, पोलिस कर्मचारी, हडपसर. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com