चित्रांतून उलगडला "आयर्न लेडी'चा जीवनपट

  चित्रांतून उलगडला "आयर्न लेडी'चा जीवनपट

पुणे - लहानपणापासून लाडात वाढलेली वडिलांची एकुलती एक मुलगी इंदिरा ते देशाच्या कारभाराची धुरा खंबीरपणे सांभाळणाऱ्या पहिल्या महिला प्रधान मंत्री...त्यांच्या विविध भावछटा...1972 मध्ये पुण्यामध्ये गाजलेली सभा...आंतरराष्ट्रीय स्तरावरील त्यांचे काम...इंदिरा गांधींच्या जीवनातील अशा विविध घटनांवर "आयर्न लेडी' या प्रदर्शनात छायाचित्रांच्या माध्यमातून प्रकाश टाकण्यात आला आहे.

इंदिरा गांधी यांच्या आगामी जन्मशताब्दी वर्षानिमित्त महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीतर्फे आयोजित या प्रदर्शनाचे उद्‌घाटन कॉंग्रेस प्रवक्ते डॉ. रत्नाकर मतकरी आणि उल्हास पवार यांच्या हस्ते झाले. या वेळी पक्षाचे शहराध्यक्ष रमेश बागवे, सरचिटणीस ऍड. अभय छाजेड, संजय बालगुडे, बंडू नलावडे, नीलेश बोराटे आदी उपस्थित होते.

प्रदर्शनात इंदिरा गांधी यांनी आपल्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीत घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांची क्षणचित्रे, सिनेकलाकार, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील महत्त्वाच्या व्यक्तींसोबतची क्षणचित्रे, नेहरू परिवाराच्या तीन पिढ्या, इंदिरा गांधींच्या राजकीय कारकिर्दीतील काही घटना छायाचित्रांद्वारे पाहता येतील.

हे प्रदर्शन बुधवारपर्यंत (ता. 3) सारसबागेजवळील ठाकरे कलादालन येथे सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत रसिकांसाठी खुले राहणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com