शहराचा पारा 35.9 अंश

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 फेब्रुवारी 2017

पुणे - शहरात उन्हाचा कडाका वाढत असून, बुधवारी पुण्यात 35.9 अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले. लोहगावमध्ये तापमानाचा पारा 37.4 अंश सेल्सिअसपर्यंत पोचला होता. राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद सोलापूरमध्ये 38.5 अंश सेल्सिअस झाली आहे. उद्या (ता. 23) पुण्यात आकाश निरभ्र राहणार असून, कमाल तापमान 35 अंश सेल्सिअसदरम्यान राहील, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.

गेल्या दोन-तीन दिवसांपासून शहरात उन्हाचे चटके बसत आहेत. आकाश निरभ्र असल्याने उन्हाची किरणे थेट जमिनीवर पडत आहेत. त्यामुळे सकाळी दहा-अकरा वाजल्यापासूनच उन्हाचा कडाका जाणवत आहे. मध्य महाराष्ट्राच्या किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट, तर कोकण-गोव्याच्या किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार, गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्‍यता आहे.

Web Title: pune temperature