यमराज म्हणतोय, का रे... यायचंय का...!

अनिल सावळे
शुक्रवार, 12 मे 2017

पुणे : वाहन चालवताना तुम्ही मोबाईलवर बोलत आहात... आणि तुमच्यासमोर खुद्द 'यमराज'च अवतरले तर... विश्‍वास बसत नाही ना...! वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करू नका, असं वाहतूक शाखेतील पोलिस अधिकारी वाहनचालकांना ओरडून-ओरडून सांगत आहेत. पण म्हणावा तितका फरक पडलेला नाही. त्यामुळे पोलिसांना आता चक्‍क 'यमराजा'ची मदत घ्यावी लागलीय...

वाहन चालवताना मोबाईलवर बोलण्यामुळे दररोज अपघात होत आहेत. काही वाहनचालकांना जीवालाही मुकावं लागलंय. या गंभीर विषयावर वाहतूक शाखेतील पोलिस अधिकारी महेशकुमार सरतापे यांनी हा लघुपट तयार केला आहे. त्यासाठी पुण्याच्या पोलिस आयुक्‍त रश्‍मी शुक्‍ला यांनी त्यांना मार्गदर्शन केले आहे.

'सीआयडी'चे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील रामानंद, सहआयुक्‍त रविंद्र कदम, वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्‍त अशोक मोराळे, डॉ. प्रविण मुंढे, कल्पना बारवकर आणि सारंग आवाड या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही त्यांना प्रोत्साहन दिले. 

तर, पाहू या ही फिल्म - यमराज म्हणतोयं, कारे... यायचंय का...!
 
व्हिडीओ गॅलरी