औरंगाबाद रॅनड्युनिअरमध्ये पुणेकर सायकलपटुंचा दबदबा

manjari
manjari

मांजरी : अॅडाॅक्स इंडिया रॅनड्युनिअर अंतर्गत औरंगाबाद रॅनड्युनिअरच्या वतीने नुकतीच चारशे व तीनशे किलोमीटर अंतराची राईड आयोजित केली होती. चारशे किलोमीटरसाठी औरंगाबाद, जालना, वाटूर, औरंगाबाद, अहमदनगर व परत औरंगाबाद असा मार्ग होता. तर तीनशे किलोमीटरसाठी औरंगाबाद, जालना, अहमदनगर व पुन्हा औरंगाबाद असा मार्ग दिला होता.

या दोन्ही राईड देशपातळीवरील सहा रायडर्स ने प्रथमच पूर्ण केली. पुणे रॅनड्युनिअरचे डॉ. चंद्रकांत हरपळे, डॉ. धनराज हेळंबे, डॉ. आदेश काळे व श्रीगोडा पाटील तसेच चेन्नईचे राजा पार्थसारथी व लुधियानाचे पवन धिंग्रा यांनी निर्धारित वेळेत पूर्ण केली.

या राईड साठी योजलेला मार्ग दिसायला सोपा परंतु चांगलाच अवघड होता. जालना कडून अहमदनगर कडे येताना हलका चढ व प्रचंड उलटा वारा सायकलपटुंची परिक्षा घेत होता. पेडलिंग थांबताच सायकल जागेवर थांबत होती. त्यातच मधेच पडणारा पाऊस तर मधेच कडक ऊन त्यामुळे निर्माण झालेला दमटपणामुळे सायकलपटुंच्या शरिरातले पाणी कमी होवून पायांत गोळे येत होते.  त्यामुळे त्यांना सतत पाणी ईलेक्ट्राल व अन्न घ्यावे लागत होते.

चारशे किलोमीटरची ही कठीण राईड पुण्याच्या चारही सायकलपटुंनी 22 तासात तर तीनशे किलोमीटरची राईड 18 तास 51 मिनीटात पूर्ण केली. अॅडाॅक्स इंडियाच्या अध्यक्षा दिव्या ताटे यांनी पुणेकर सायकलपटुंचे अभिनंदन केले. हडपसर येथील सायकलपटू डॉ. प्रकाश डुबे पाटील, डॉ. राहुल झांजुर्णे, दशरथ जाधव यांनी सर्व सायकलपटुंचे अभिनंदन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com