पुणेकरांची सोमवार सकाळ वाहतूक कोंडीतच!

vadgav  rasta
vadgav rasta

पुणे : सिग्नल, खड्डे आणि पावसामुळे पुणेकरांची सोमवार सकाळ वाहतूक कोंडीतच गेली. मेट्रोचे काम सुरू असलेल्या मार्गांवर सकाळपासून वाहतूक अत्यंत संथ गतीने सुरू आहे. 

शनिवार आणि रविवारच्या तुलनेत सोमवारी सकाळी वाहतूक जास्त असते. त्यातच सकाळपासून पावसानेही हजेरी लावल्याने वाहतूक संथ झाली. खड्डे आणि बंद असलेले सिग्नल यांचीही भर पडल्याने बहुतांश पुणेकरांना आठवड्याच्या सुरवातीलाच वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. कोंडी झालेल्या बहुतांश ठिकाणी वाहतूक पोलीस नियंत्रण करत आहेत. 

सातारा-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर वडगावजवळील पुलावर गेले दोन तासाहून अधिक वेळ वाहतूक कोंडी झाली आहे. या रस्त्यावर चार ते पाच किलोमीटरहून जास्त मोठ्या रांगा लागल्या आहेत. कात्रज परिसरात पावसामुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. 
कात्रज ते नवले पुलापर्यंतचा रस्ता वाहतूक कोंडीमुळे बंद झाला आहे.

बिबवेवाडी रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली आहे. टिळक रस्ता, आंबील ओढा परिसर इथेही कोंडी झाली आहे. 
सिंहगड रस्त्यावर सिग्नल बिघडल्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. 
ब्रेमेन चौक, पुणे विद्यापीठ चौकापासून कृषी महाविद्यालय उड्डाणपुलापर्यंतचे सिग्नल बंद असल्याने वाहतूक संथगतीने चालू आहे. 


ज्ञानेश्वर पादुका चौक ते बालगंधर्व रंगमंदिर चौकादरम्यान आणि 
कोथरूडला वनाज कंपनीपासून नळ स्टॉपपर्यंत अत्यंत संथ वाहतूक सुरू आहे. पौड फाटा उड्डाणपुलाच्या खाली सिग्नल असूनही अधूनमधून कोंडी होत असल्याने नळ स्टॉपच्या चौकापर्यंत खोळंबा होत आहे. 

कात्रज परिसरात पावसामुळे वाहतुकीवर परिणाम झाला असून कात्रज ते नवले पुलापर्यंत रस्ता वाहतूक कोंडीमुळे बंद झाला आहे. 
विश्रामबाग ते महाराणा प्रताप उद्यान, बाजीराव रस्त्यावर तूरळक वाहतूक कोंडी झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com