पुण्याचे उपमहापौर नवनाथ कांबळे यांचे हृदयविकाराने निधन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 मे 2017

पुणे महानगरपालिकेतील उपमहापौर नवनाथ कांबळे यांचे आज (मंगळवार) सकाळी हृदयविकाराच्या धक्‍क्‍याने निधन झाले.

पुणे : पुण्याचे उपमहापौर नवनाथ कांबळे यांचे आज (मंगळवार) सकाळी हृदयविकाराच्या धक्‍क्‍याने निधन झाले.

आज सकाळी कांबळे मॉर्निंगवॉकला निघाले. त्यावेळी त्यांना धक्का आला. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तेथे त्यांचा मृत्यू झाला. कांबळे रिपाईचे नगरसेवक होते. दलित पॅंथरमध्येही त्यांचा सक्रिय सहभाग होता. 1997 मध्ये ते नगरसेवक म्हणून प्रथम निवडून आले. त्यानंतर सन 2002 मध्ये झालेल्या त्रिसदस्सीय प्रभाग पद्धतीमध्ये प्रभाग क्रमांक चौदा (किर्लोस्कर न्युमॅटिक कंपनी) या प्रभागातून ते विजयी झाले होते. निवडून आल्यानंतर शहर सुधारणा समितीचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. रिपाईचे शहराध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते.

Web Title: punes deputy mayor navnath kamble dies