राष्ट्रवादीचेच दोन पॅनेल एकमेकांसमोर आल्याने लढत होणार अटीतटीची

ncp
ncp

मांजरी (पुणे): शेवाळवाडी ग्रामपंचायत पोटनिवडणूकीत चांगलाच रंग भरू लागला असून राष्ट्रवादी काँग्रेसचेच दोनच पॅनेल एकमेकांसमोर आल्याने येथील लढत अटीतटीची झाली आहे. परिवर्तन पॅनेल व शिवशंभो ग्रामविकास पॅनेल अशा दोन पॅनेलमध्ये ही लढत होत आहे.

विरोधी पॅनेल मधील तृटी दाखवत व घरटी प्रचारावर जोर देत दोन्हीही पॅनेलचे उमेदवार नागरिकांशी संवाद साधत आहेत. प्रचार पत्रके, कोपरा सभा, नातीगोती, भाऊबंदकी आदी विविध प्रकारच्या माध्यमातून मतदारांना समज घालत उमेदवार आपल्यालाच मतदान करण्याचे आवाहन करीत आहेत. पदयात्रा, कोपरा बैठका, ध्वनिवर्धक वाहने, सोशल मिडिया यांचा खुबिने वापर येथे केला जात आहे. त्यामुळे गावातील वातावरण पूर्णपणे निवडणूकमय झाले आहे.

शिवशंभो पॅनलचे प्रमूख राहुल शेवाळे म्हणाले,""गेली अनेक वर्षांपासून आम्ही शेवाळवाडीच्या सर्वांगिन विकासाचे ध्येय ठेवून काम करीत आलो आहोत. वीज, कचरा, पाणी याबाबत गाव स्वयंपूर्ण करण्याकडे आम्ही कल दिला आहे. कोट्यावधी रूपयांचा निधी गावात आणण्यात यश मिळविले आहे. आता भयमुक्त गाव आणि टँकर एेवजी बंद नळाने पालिकेचे पाणी मिळावे यासाठी आमचा लढा सुरू आहे.  त्यासाठी याही वेळी ग्रामस्थ आम्हाला कौल दिल्याशिवाय राहणार नाहीत.'' पॅनेल प्रमूख पंढरिनाथ शेवाळे, अशोक मोरे, पोपट कामठे, प्रवीण चोरघडे आदी यावेळी उपस्थित होते.

परिवर्तन पॅनेलचे प्रमूख विक्रम शेवाळे म्हणाले,""गावातील स्वयंघोषीत पुढाऱ्यांनी विकासाच्या नावाखाली नागरिकांना वेठीस धरून विकासाचे खोटे स्वप्न दाखविले आहे. ठेकेदारांना हाताशी धरून निकृष्ठ दर्जाची कामे केली आहेत. केवळ दिखावा करून ग्रामस्थांची फसवणूक केली आहे. त्यांना कंटाळून अनेक कार्यकर्ते त्यांच्याच विरोधात एक झाले आहेत. नागरिकांना त्यांची लबाडी समजली असून आता जागा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत. यापूर्वी अनेक वर्षे शेवाळवाडी गावाला विकासाची दिशा देण्याचे व एकी ठेवण्याचे काम माजी आमदार जगन्नाथ शेवाळे यांनी केले आहे. त्यांचे विचार व पॅनेल प्रमुखांसह आमच्या उमेदवारांवर विश्र्वास ठेवून ग्रामस्थ निश्र्चितपणे यावेळी आमच्या पाठीशी उभे राहतील अशी खात्री आहे. पॅनेलप्रमूख भारती शेवाळे, वसंत शेवाळे, जीवन शेवाळे, अशोक शेवाळे, राजाराम शेवाळे, संजय शेवाळे यावेळी उपस्थित होते.

परिवर्तन पँनेलने प्रभाग क्रमांक एक मधून प्रियंका अमोल शेवाळे, अमोल विठ्ठल जगताप, अश्विनी सुनील चोरघडे. दोन मधून अमीत सुरेश पवार,  उमेश गणपतराव दंडे, संदीप सुवर्णा कोद्रे. तीन मधून कविता सचिन मेमाणे, माधुरी अमीत शेवाळे, अक्षय वसंतराव शेवाळे. चार मधून  स्मिता रामदास अक्काले, अशोक मलका शिंदे यांना उमेदवारी दिली आहे.

शिवशंभो पँनेलने प्रभाग क्रमांक एक मधून दीपक आनाजी घाडगे, निता प्रवीण चोरघडे, विद्या आण्णासाहेब शेवाळे, दोन मधून विजय बाळासाहेब कोद्रे, संगिता राजेंद्र शेवाळे, सुनील बबनराव शेवाळे, तीन मधून रोहिणी विलास शेवाळे, राजेंद्र सयाजी घुले, वर्षा संजय कारले, चार मधून विजय पांडुरंग खंडागळे, माधुरी विक्रांत मोरे यांना उमेदवारी दिली आहे.

शेवाळवाडी ग्रामपंचायतचे सरपंच पद अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखी आहे. प्रभाग क्रमांक चार मध्ये ही जागा असल्याने दोन्हीही पँनेलने येथील उमेदवार निवडून आणण्यासाठी विशेष प्रयत्न चालविले आहेत. येथील एक-एक मत महत्वाचे मानून पँनेल प्रमुखांकडून त्यासाठी गुप्त हलचालींना महत्त्व दिले जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com