विमानतळाच्या जागेचे फेरमूल्यांकन

विमानतळाच्या जागेचे फेरमूल्यांकन

पुणे - पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनासाठी नेमका किती खर्च येणार हे जाणून घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून या जागेचे फेरमूल्यांकनाचे काम सुरू करण्यात आले आहे. फेरमूल्यांकनाचा अहवाल तयार झाल्यानंतर भूसंपादनाच्या मोबदला किती द्यावा, हे निश्‍चित केले जाणार आहे. त्यानंतर प्रत्यक्षात भूसंपादनाच्या कामाला सुरू होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

पुरंदर येथील विमानतळासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीस ‘विशेष नियोजन समिती’ म्हणून आणि २ हजार ८३२ हेक्‍टर जागा ताब्यात घेण्यास नुकतीच राज्य सरकारने परवानगी दिली आहे. त्यामुळे विमानतळाचे काम मार्गी लागण्याच्या दृष्टीने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल समजले जात आहे. त्यामुळे पुढील टप्प्यात विमानतळासाठी भूसंपादनाचे काम सुरू होणार आहे. दरम्यान, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडून यापूर्वीच विमानतळाच्या तांत्रिक आणि आर्थिक व्यवहार्य अहवाल तयार करण्याचे काम जर्मन येथील डार्स या कंपनीला देण्यात आले आहे. या कंपनीकडून त्या संदर्भातील अहवाल लवकरच सादर करण्यात येणार आहे. 

राज्य सरकारने विमानतळासाठी २८३२ हेक्‍टरची हद्दनिश्‍चित करून दिली आहे. प्रत्यक्षात कोणत्या जागेवर विमानतळाची उभारणी होणार आहे. हे अद्याप निश्‍चित नाही. विमानतळासाठी प्रत्यक्षात २२०० ते २३०० हेक्‍टरपर्यंतची जागा लागेल, असे अपेक्षित आहे. धावपट्टी, पार्किंग बे, टर्मिनल, कार्गो हब अशा विमानतळासाठी आवश्‍यक असलेल्या कामांसाठी प्रत्यक्षात किती जागा लागणार आहे, यांची विचारणा डार्स कंपनीकडे करण्यात आली आहे. त्यांच्याकडून माहिती उपलब्ध झाल्यानंतर तेवढ्या जागेचे भूसंपादन करण्यात येणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना द्यावयाचा मोबदल्यासाठी तेथील संपादित कराव्या लागणाऱ्या जमिनीचे फेरमूल्यकंनाचे काम सुरू करण्यात आले आहे. यापूर्वी मूल्यांकन निश्‍चित करण्यात आले होते. मात्र त्यास तीन वर्षांचा कालावधी  होऊन  गेला. दरम्यानच्या कालावधीत रेडी-रेकनर आणि तेथील जमिनीच्या दरामध्ये मोठा फरक पडला आहे. त्यामुळे नव्याने फेरमूल्यांकन करून घेण्यात येत असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com